शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

वेगाची नशा घेतेय अकाली बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 3:52 AM

लक्ष्मण मोरे पुणे : अत्याधुनिक इंजिन आणि प्रचंड वेगासाठी तयार करण्यात आलेल्या दुचाकींमुळे तरुणांमध्ये वेगाची नशा वाढत आहे. हीच वेगाची नशा स्वत:सह इतरांच्याही जिवावर उठली आहे. रस्त्यावर होणाऱ्या  अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११० दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला असून गेल्या तीन वर्षांत ...

लक्ष्मण मोरे पुणे : अत्याधुनिक इंजिन आणि प्रचंड वेगासाठी तयार करण्यात आलेल्या दुचाकींमुळे तरुणांमध्ये वेगाची नशा वाढत आहे. हीच वेगाची नशा स्वत:सह इतरांच्याही जिवावर उठली आहे. रस्त्यावर होणाऱ्या  अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११० दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला असून गेल्या तीन वर्षांत जवळपास ६५० दुचाकीस्वारांना रस्त्यावर प्राण गमवावे लागले आहेत.आधुनिक ‘मेक’च्या दुचाकी वापरण्याकडे तरुणांचा अधिक कल आहे. सुसाट आणि वेडीवाकडे वळणे घेत जाणाºया दुचाकी रस्त्यांवर पाहून भीती वाटते. रस्त्यावरून गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि रुग्ण नागरिक जात असतात. शाळकरी मुले, पादचारी यांचीही रस्त्यावर वर्दळ असते. परंतु बेदरकार वाहनचालक स्वत:च्या धुंदीत बेफाम जातात. वेडीवाकडी वळणे घेत, मैत्रिणींना खूष करण्यासाठी दुचाकी भरधाव चालवल्यामुळे अपघात घडतात. वाहतूक पोलिसांकडून अशा दुचाकींवर कारवाई केली जाते; परंतु वाहनाचा वेग मोजणाºया ‘स्पीड गन’ वाहतूक पोलिसांकडे कमी असल्यामुळे या कारवायांमध्ये मर्यादा येतात. प्रचंड गर्दी असूनही त्या गर्दीमधून ‘गॅप’ काढत जाणारे तरुण, मोबाइल कानाला लावून दुचाकीवर बोलणारे, महामार्गांवर अवजड वाहनांना खेटून घेतली जाणारी वळणे, त्यांना ‘कट’ मारणे अशा अनेक कारणांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात झालेले आहेत. विशेषत: वळणांवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर किंवा पदपथाला धडकल्यानेही अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. अनेकदा दारू पिऊन दुचाकी चालवल्यामुळे, तसेच वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे.शहरातील रस्त्यांवर महिन्याकाठी शेकडो अपघात होत आहेत. अपघात घडविणाºया व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे सुशिक्षितांचे आहे. बेफाम सोडलेला अ‍ॅक्सिलेटर, वेगाची प्रचंड नशा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यांमुळे पुण्यातील रस्त्यांवर शेकडो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. उपनगरातीलच नव्हे, तर शहराच्या मध्यवस्तीतही भरधाव जाणारी वाहने म्हणजे चालतीबोलती ‘किलिंग’ मशिन ठरत आहेत. पुण्यातील रस्त्यांवर गेल्या सहा महिन्यांत गंभीर स्वरूपाच्या १७८ अपघातांमध्ये १८३ निष्पापांचे बळी गेले आहेत.उरात धडकी भरविणारा वाहनांचा वेग अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे. अनेक अपघातांत दोष नसताना घरातील कमावती व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.वाहन चालवताना संयम दाखविल्यास अपघात कमी होऊन होणारी जीवितहानी टळेल. ‘मानवी जीवन अमूल्य आहे आणि ते जपायला हवे,’ असे नेहमी सांगण्यात येते; परंतु वाहनचालकांमधील बेदरकार वृत्ती आणि वेगाची नशा या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. पुणेकर वाहनचालकांकडून सर्रास होणारे वेगमर्यादेचे उल्लंघन ही नित्याचीच बाब झाली. पुणेकर वाहनचालकांचे आणि शिस्तीचे एकमेकांशी दुरदुरूनही नाते नाही की काय, अशीच परिस्थिती सध्या दिसते आहे. धोकादायक अवस्थेत ओव्हरटेक करणे, लेन कटिंग करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, वाहनात मर्यादेपेक्षा अधिक माणसांचा, सामानाचा भरणा करणे (ओव्हरलोडिंग), वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान यांमुळे रस्त्यांवरील अपघांची संख्या वाढत चालली आहे.या गोष्टी करालेनची शिस्त पाळावेगमर्यादेचे पालन कराअपघातग्रस्तांना मदत करादुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावेचारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर करावावाहनाच्या हेडलाईट, टेल लॅम्प,पार्किंग लाईट तपासासर्व वाहतूक नियमांचेपालन करावेगमर्यादेचेउल्लंघन करणेवाहनांमध्येस्पर्धा करणेमर्यादेपेक्षा अधिक माणसे अथवासामान भरणेया गोष्टी टाळावाहन चालविताना मोबाइलवर बोलणेदारू पिऊन वाहन चालविणेधोकादायक अवस्थेत ओव्हरटेकिंग करणेचुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क करणेबेकायदा व अशास्त्रीय पार्किंगही जबाबदारअनेकदा अरुंद रस्त्यांवर व गर्दीच्या ठिकाणीही वाहनांचे वेडेवाकडे पार्किंग होते. अनेक हॉटेल आणि मॉल व मोठ्या दुकानांसमोर बेकायदा पार्किंग असते. त्यातून मार्ग काढणाºया छोट्या वाहनांना जड वाहनांच्या धडकेमुळेही रस्त्यांवर अपघात होत आहेत.अनेक इमारतींमधील पार्किंग व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात आहे. पर्यायाने इमारतीसमोरच वाहने लागायला सुरुवात होते. अशा व्यावसायिकांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करीत नाही.सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे,नो एंट्रीत वाहने चालविणे,हेल्मेट व सीट बेल्टचा वापरन करणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.