अवकाळी पावसाने उन्हाळी पिके भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST2021-05-11T04:09:38+5:302021-05-11T04:09:38+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील खरपुडी, दावडी, रेटवडी, निमगाव, होलेवाडी या परिसरात दि. ९ रोजी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. पावसाबरोबर ...

अवकाळी पावसाने उन्हाळी पिके भुईसपाट
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील खरपुडी, दावडी, रेटवडी, निमगाव, होलेवाडी या परिसरात दि. ९ रोजी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. पावसाबरोबर वारा वाहत असल्याने उन्हाळी बाजरी, तरकारी पिके, जनावरांचा हिरवा चारा भुईसपाट झाला. उन्हाळी बाजरीचे पीक काढणीला आले आहे. मात्र, पावसाने पीक भुईसपाट केले. वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या खाली पडल्या. ठिकठिकणी उन्हाळी बाजरी काढणीचे काम सुरू आहे. पावसामुळे काढणी करून ठेवलेली बाजरीची कणसे शेतात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे.
तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सायकाळी रोज थोडातरी पाऊस पडत आहे. रविवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकासह वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले. तयार केलेल्या कच्या विटा पावसाने भिजून जाऊन नुकसान झाले आहे.
१० दावडी
खेड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली.