शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; 9 संघांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 11:12 PM

भरत नाट्य मंदिर येथे गेल्या चौदा दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये 50 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी पार पडली.

पुणे : अरे आव्वाज कुणाचा’ च्या जल्लोषात सुरू झालेल्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये नऊ संघ दाखल झाले आहेत. महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. कोरोनामुळे स्पर्धेच्या परंपरेत काहीसा खंड पडला. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने संस्थेने स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला. त्यानुसार भरत नाट्य मंदिर येथे गेल्या चौदा दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये 50 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी पार पडली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 9 संघांची वर्णी लागली. त्यामध्ये आयएमएमसी (वरात), कावेरी महाविद्यालय (सफर), प.भू वसंतदादा पाटील इंडस्ट्री आॅफ टेक्नॉलॉजी, बावधान (कला?), बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (मंजम्मा पुराणम), श्रीमती काशीबाई नवले अभिायांत्रिकी महाविद्यालय (एव्हरी नाइट इन माय ड्रीम्स), पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर (सहल), मॉर्डन महाविद्यालय, गणेशखिंड (भाग धन्नो भाग), अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (पाणीपुरी) आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय (कंप्लीट व्हॉईड) यासंघांचा समावेश आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी दि. 22 व 23 जानेवारी रोजी होणार असून, दरवर्षीप्रमाणे शेवटच्या दिवशी त्या त्या फेरीतील निकाल जाहीर होतील.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 29 जानेवारी रोजी होईल. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मयुरेश कुलकर्णी, विश्वास करमरकर आणि मंदार पटवर्धन यांनी काम पाहिले.स्पर्धेतील अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिकेअनुष्का गोखले (ठसका, एम एम सी सी), मैत्रेयी हातवळणे ( हिरवीन, पी सी सीओ ई), अरूण गावडे (अस्थिकलश, मॉडर्न महाविद्यालय), तन्वी कांबळे (शोधयात्रा, कमिन्स), राज निंबाळकर (लाल, टीमवि), अथर्व शेटे (द हंगरी, म.ए सो सीनिअर महाविद्यालय), मुकुल ढेकले (घुंगरू एमएमसीसी), ॠषिकेश वनवे (झापडं, जी एच रायसोनी), राघव वर्तक (कधीतरी, इंडसर्च) आणि राजेशनागरगोजे (क्षुधा, टिळक आयुर्वेद महाविद्यालय)

* उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक शुभम शहाजी घोडके (म्हातारा पाऊस, न्यू आटर््स महाविद्यालय)*उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक शांभवी जोशी (शोधयात्रा, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय)