शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंग तपासणी, भ्रूणहत्या मी होऊ देणार नाही; ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’ उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:00 IST

शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन..

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सदस्यांनी घेतली शपथ : स्वाक्षरी मोहिमेद्वारे संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीअंगणवाडी सेविकांमार्फत पालकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार

पुणे : ‘मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी स्त्री भ्रूणहत्या होऊ देणार नाही. मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन,’ अशी शपथ घेऊन संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम पोहोचविण्याठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोर्डावर स्वाक्षरी करून ‘बेटी बचाव’चा नारा दिला.  जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यामहिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेत  ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेअंतर्गत राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राष्ट्रीय कन्या सप्ताहाचे  उद्घाटन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, राणी चौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, महिला-बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे, विस्तार अधिकारी नितीन पवार व सुरेश गुंजाळ तसेच जिल्हा परिषद सदस्या उपस्थित होत्या.  स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. याअंतर्गत पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्हाभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’ असे या उपक्रमाचे नाव असून, २० ते २६ जानेवारी या काळात मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, विशेष ग्रामसभा, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार, आशा व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत पालकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. ..........जिल्हाधिकाऱ्यांनी फलकावर स्वाक्षरी करून घेतली शपथ!जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फलकावर स्वाक्षरी करून ‘मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही’ अशी शपथ घेतली. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याची सूचना त्यांनी केली. ...........स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात या आठवड्यात राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राष्ट्रीय कन्या सप्ताह  राबवणार आहोत. या कार्यक्रमानुसार स्त्रीजन्माच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातील. - दत्तात्रय मुंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाzpजिल्हा परिषदdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल