बिटकॉइनचे आमिष दाखवून ‘प्रीत’ने सात लाखांना गंडवले, पुण्यातील फसवणुकीची घटना

By भाग्यश्री गिलडा | Published: April 18, 2024 04:32 PM2024-04-18T16:32:54+5:302024-04-18T16:33:28+5:30

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत अधिक पैसा मिळतो, असे सांगितले...

'Preet' defrauded 7 lakhs by showing the bait of Bitcoin, fraud case in Pune | बिटकॉइनचे आमिष दाखवून ‘प्रीत’ने सात लाखांना गंडवले, पुण्यातील फसवणुकीची घटना

बिटकॉइनचे आमिष दाखवून ‘प्रीत’ने सात लाखांना गंडवले, पुण्यातील फसवणुकीची घटना

पुणे : बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आणि चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी प्रित त्रिवेदी (वय ३२, रा. सहकार नगर) हिच्याविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, हा प्रकार ४ ते १७ एप्रिल या दरम्यानच्या काळात घडला आहे. याबाबत नितीन लक्ष्मणराव भोसले (वय ३२, रा. शिवाजी नगर) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादींना त्रिवेदी हिने बिटकॉइनची विक्री करण्यास मदत करते, असे सांगितले.

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत अधिक पैसा मिळतो, असे सांगितले. फिर्यादींचा त्रिवेदीवर विश्वास बसल्याने फिर्यादींनी गुंतवणूक करण्यास होकार दिला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने भोसले यांना ७ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. प्रत्यक्ष कोणताही परतावा न मिळाल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याप्रकरणी प्रित त्रिवेदी हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल माने हे करत आहेत.

Web Title: 'Preet' defrauded 7 lakhs by showing the bait of Bitcoin, fraud case in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.