शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज; राज्यात अवकाळी पाऊस घटण्याची शक्यता

By नितीन चौधरी | Updated: May 3, 2023 18:04 IST

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यात असलेली आर्द्रता कमी होऊन पाऊस घटणार

पुणे: येत्या ७ व ८ मेरोजी बंगालच्या उपसागरात चक्रावाताची अर्थात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. याचा राज्याला फायदाच होणार असून अवकाळी पाऊस घटणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट असेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पाचव्या दिवशी अर्थात ७ तारखेनंतर पावसाची शक्यता कमी होईल

याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘’दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत एक द्रोणिका रेषा अर्थात हवेची विसंगती तयार झाली आहे. तसेच दक्षिण छत्तीसगडवर हवेचा एक चक्रावात तयार झाला आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरावर ६ तारखेच्या सुमारास एक चक्रावात तयार होण्याची शक्यता आहे. सात तारखेला याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल, तर ८ तारखेला हे कमी दाबाचे क्षेत्र वाढेल. त्यानंतर याची तीव्रता आणखी वाढून चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्याची दिशा उत्तरेकडे असण्याची शक्यता आहे.’’ 

परिणामी पुढील ७२ तासांत अवकाळी पावसाची तयार झालेली स्थिती कमी होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यात असलेली आर्द्रता कमी होऊन पाऊस घटणार आहे. तसेच तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, पाच तारखेनंतर आर्द्रता कमी झाल्याने कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवसांसाठी अवकाळी पाऊस कमी होणार आहे. पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट असेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पाचव्या दिवशी अर्थात ७ तारखेनंतर पावसाची शक्यता कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणHealthआरोग्यTemperatureतापमानcycloneचक्रीवादळ