शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 12:57 IST

स्वारगेट, शिवाजीनगर, संगमवाडी व पुणे स्टेशन या चार ठिकाणी बाहेरगावी ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

ठळक मुद्दे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव नुकताच ‘आरटीए’समोरनवीन योजनेच्या अंमलबजावणीची संपुर्ण जबाबदारी वाहतुक पोलिसांवर राहणार

पुणे : काही वर्षांपूर्वी बंद पडलेली प्रीपेड रिक्षा सेवा शहरात पुन्हा लवकरच सुरू होणार आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, संगमवाडी व पुणे स्टेशन या चार ठिकाणांहून ही सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणा (आरटीए) कडून नुकतीच या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. शहरात काही वर्षांपूर्वी पुणे स्टेशन, स्वारगेट व शिवाजीनगर या वर्दळीच्या ठिकाणांहून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेला रिक्षांसह प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. पण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुटी राहिल्याने काही महिन्यांतच ही योजना गुंडाळावी लागली. आता पुन्हा साडे तीन ते चार वर्षांनी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव नुकताच ‘आरटीए’समोर मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पूर्वीच्या तीन ठिकाणांमध्ये आता संगमवाडीचाही समावेश करण्यात आला आहे. चारही ठिकाणी बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे.नवीन योजनेच्या अंमलबजावणीची संपुर्ण जबाबदारी वाहतुक पोलिसांवर राहणार आहे. जागेची निवड, सुविधा निर्माण करणे, योजना कार्यान्वित करून अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांकडेच सोपविण्यात आले आहे. आरटीओकडून या योजनेचा आराखडा तयार करून देण्यात आला आहे. रिक्षाचे टप्पानिहाय भाडे, अंतर आदी माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे. हे भाडेही निश्चित करण्यात आले आहे. अनेकदा जवळच्या अंतरासाठी रिक्षा चालकांकडून नकार दिला जातो. त्यानुसार अंतर व भाडे याचा ताळमेळ घालण्यात आला आहे. जेणेकरून रिक्षा चालकांनाही जवळचे भाडे घेणे परवडेल, असे समजते.-----------आरटीओकडून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याबाबत आरटीएकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली असून पुढील अंमलबजावणी वाहतुक पोलिसांकडून केली जाणार आहे. त्यांच्या स्वतंत्र यंत्रणा ही सेवा कार्यान्वित करेल. आरटीओकडून भाडे निश्चित करून देण्यात आले आहे. - विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीप्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे विभाग

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसauto rickshawऑटो रिक्षाpassengerप्रवासीRto officeआरटीओ ऑफीस