शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:38 IST

या प्रकरणात 'अरुष' नावाचा व्यक्ती महिलांना पुरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तो सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण करत होता.

पुणे -  खराडी येथील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणात सक्रीय भूमिका घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून सखोल तपासाचे आदेश दिले होते, तर आज आयोगाने या प्रकरणात मानवी तस्करीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.पत्रात नमूद केल्याप्रमाणे, प्रांजल खेवलकर या व्यक्तीने स्वतःच्या नावावर तब्बल २८ वेळा हॉटेलमध्ये रुम बुक करून विविध मुलींना बोलावल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.रुपाली चाकणकर म्हणाल्या की, खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये मोठ्या प्रमाणावर नग्न आणि अर्धनग्न फोटो, तसेच व्हिडिओ आढळले आहेत. एकूण १,७४९ नग्न फोटो व व्हिडिओ असून, त्यामध्ये २३४ फोटो आणि २९ व्हिडिओ अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. हे सर्व फोटो व व्हिडिओ पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. महिलांना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून लोणावळा, साकीनाका परिसरात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. त्या ठिकाणी महिलांवर नशा देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. काही महिलांशी आपत्तीजनक चॅटिंगही करण्यात आले आहे. पीडितांमध्ये मोलकरणींचाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणातील गंभीर स्वरूप लक्षात घेता, विशेष तपास पथक (SIT) ने तपास करावा व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आयोग याप्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अरुष नावाच्या व्यक्तीचा सहभागया प्रकरणात 'अरुष' नावाचा व्यक्ती महिलांना पुरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तो सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण करत होता. मानवी तस्करी विरोधी पथकाने या प्रकरणात तपास सुरु केला असून, आरोपींनी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा, मोबाईल आणि ईमेलचा तपास करण्याची गरज असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRupali Chakankarरुपाली चाकणकर