मावडी सुपेच्या सरपंचपदी प्रमिला देवकर, तर उपसरपंचपदी आत्माराम देवकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST2021-03-01T04:12:04+5:302021-03-01T04:12:04+5:30
या वेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल देवकर, शामराव देवकर, ग्रामपंचायत सदस्या सविता बहीरट, सोनाली देवकर उपस्थित होत्या. मावडी सुपे ग्रामपंचायत ...

मावडी सुपेच्या सरपंचपदी प्रमिला देवकर, तर उपसरपंचपदी आत्माराम देवकर
या वेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल देवकर, शामराव देवकर, ग्रामपंचायत सदस्या सविता बहीरट, सोनाली देवकर उपस्थित होत्या. मावडी सुपे ग्रामपंचायत स्थापनेपासून सर्व जागेवर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलने पहिल्यांदाच विजय मिळवून एकहाती सत्ता आणली. खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासाला प्राधान्य देऊन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास करणार असल्याचा मानस मावडी सुपेच्या सरपंच प्रमिला देवकर व उपसरपंच आत्माराम देवकर यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. जितेंद्र देवकर, शंकर देवकर, तुकाराम वाईकर, बाळासो बहिरट, महादेव देवकर, मधुकर देवकर, राजेंद्र देवकर, प्रल्हाद देवकर, शिवाजी बहिरट यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
२८ भुलेश्वर मावडी सुपे
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्यासमवेत ग्रामस्थ.