शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Pradip Mehara: पुणे पोलिसाचं महत्त्वाचं आवाहन, प्रदीप मेहराच्या फोटोवरुन भन्नाट क्रिएटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 16:26 IST

व्हायरल व्हिडिओतील प्रदीपला कारचालकाने दिलेली लिफ्ट तो नाकारतो

मुंबई/पुणे - सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये १९ वर्षांचा मुलगा रात्री उशिरा धावताना दिसत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे नाव प्रदीप मेहरा (Pradeep Mehra) असं आहे. तसेच तो मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी असून आर्थिक संकटामुळे प्रदीप नोएडा येथील मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो मोठे कष्टही घेत आहे. कामावरुन सुटल्यानंतर तो 10 किमी धावत आपल्या घरी पोहोचतो. या व्हायरल प्रदीप मेहराच्या फोटोवरुन पुणे पोलिसांनी भन्नाट क्रिएटीव्ह ट्विट केलं आहे. 

व्हायरल व्हिडिओतील प्रदीपला कारचालकाने दिलेली लिफ्ट तो नाकारतो. तसेच, आपल्या धेय्यासाठी मार्गक्रमण करतो. त्यावरुनच, पुणे पोलिसांच्या साबयर विभागाने भन्नाट मिम्स बनवले आहे. तुम्हालाही अशाचप्रकारे कुणीतरी ओटीपी मागेल, पण तुम्ही सुरक्षितपणे पुढे मार्गक्रम करत राहायचं. म्हणजेच, कोणालाही आपला ओटीपी द्यायचा नाही, कोणाच्याही गाडीत बसून स्वत:ची फसवणूक करुन घ्यायाची नाही, असे पुणे पोलिसांनी सूचवले आहे.  फोनवरुन जेव्हा टेलिकॉलर तुम्हाला ओटीपी मागतात, तेव्हा त्यांच्या मोहात न पडता सुरक्षितपणे आपलं मार्गक्रमण करत राहायचं, असे कॅप्शन पुणे पोलिसांनी दिले आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांचे हे क्रिएटीव्ह ट्विट दिग्दर्शक विनोद कापरी यांनाही आवडले असून त्यांनी ते रिट्विट केलं आहे. तसेच, मनापासून आवडल्याचं सिम्बॉलिक चिन्ह त्यांनी दर्शवलं आहे.  

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान, विनोद कापरी हे त्याला आपल्या गाडीतून घरी सोडण्यीच ऑफर देतात. परंतु ते तो नाकारतो. त्यानंतर तो आपण मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जात असल्याचंही सांगतो. आपलं नाव प्रदीप असल्याचं सांगतो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी असल्याचंही त्यानं सांगितलं. तसंच आपण लष्करात जाण्यासाठी तयारी करत असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचंही तो सांगताना दिसत आहे.

टॅग्स :PuneपुणेViral Photosव्हायरल फोटोज्Twitterट्विटरMumbaiमुंबई