शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

प्रभा अत्रे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 7:02 PM

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा नावलौकिक आहे. या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्य सैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देभारतीय अभिजात संगीत क्षेत्रात म्हणून डॉ. प्रभा अत्रे किराणा घराण्याच्या गायिका म्हणून नावलौकिक पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली,रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचना

पुणे:  पुण्यभूषण फाऊंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. भारतीय अभिजात संगीत विश्वातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविली आहे.ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे ठरविले आहे. पुरस्काराची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच हा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान, पं. जसराज,ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांसारख्या सांगीतिक क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्काराचे यंदाचे ३० वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्य सैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये रघुनाथ गंगाराम लकेश्री, बलबीर सिंग, संदीप बाजीराव उकिरडे, विनीता अशोक कामटे (कै.अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दीनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांचा समावेश आहे. भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात किराणा घराण्याच्या गायिका म्हणून डॉ. प्रभा अत्रे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा नावलौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा,गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे काम त्यांनी केले. प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली,रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली.तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायकीची ओळख करून दिली. प्रभाताईंनी शास्त्रीय संगीतावर मराठी, इंग्रजी भाषांमध्ये पुस्तके लिहिली. ’स्वरमयी’,‘स्वरांगिणी’आणि ’स्वररंजनी’ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. 

टॅग्स :Puneपुणे