वीजबिलापोटी पालिकेची महिन्याला २५ लाखांची बचत

By Admin | Updated: November 30, 2015 02:01 IST2015-11-30T02:01:52+5:302015-11-30T02:01:52+5:30

शहरातील सर्व रस्त्यांवरचे दिवे, उद्याने, महापालिकेची दवाखाने, मुख्य इमारत व इतर कार्यालयांमधील लाइटचे २९०० मीटर... यांची बिले एकाच वेळी प्रत्येक कार्यालयातून वेगवेगळया वेळेस येणार..

Power saving of 25 lakhs of electricity bill for the month of electricity | वीजबिलापोटी पालिकेची महिन्याला २५ लाखांची बचत

वीजबिलापोटी पालिकेची महिन्याला २५ लाखांची बचत

दीपक जाधव, पुणे
शहरातील सर्व रस्त्यांवरचे दिवे, उद्याने, महापालिकेची दवाखाने, मुख्य इमारत व इतर कार्यालयांमधील लाइटचे २९०० मीटर... यांची बिले एकाच वेळी प्रत्येक कार्यालयातून वेगवेगळया वेळेस येणार... त्यानंतर ती भरण्यास होणारा विलंब... महापालिकेला नाहक बसणारा दंड... या जुनाट यंत्रणेमध्ये मोठा बदल घडवून आणत महापालिकेच्या विद्युत विभागाने पालिकेच्या दरमहा येणाऱ्या वीजबिलामध्ये २५ लाख रुपयांची बचत केली आहे.
पुणे महापालिकेचा पसारा प्रचंड मोठा आहे, पालिकेच्या २९०० मीटरचे वीजबिल भरण्यासाठी पालिकेमध्ये एक उपअभियंता, एक सिनिअर क्लार्क, २ ज्युनिअर क्लार्क, ४ अस्टिटंट, एक चारचाकी, त्याचा ड्राइव्हर एवढी यंत्रणा महिनाभर राबत असे. केवळ वीजबिल भरण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा कार्यरत असणे चुकीचे असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी पुढाकार घेतला.
महावितरणच्या २५ सबडिव्हिजन कार्यालयातून वेगवेगळया तारखांना महापालिकेची वीज बिले दिली जात होती. त्या बिलांची तपासणी करणे, त्याची रजिस्टरमध्ये नोंद करून त्यावर सही शिक्का मारणे. त्यानंतर ते भरण्यासाठी देणे अशी साधारणपणे कार्यपद्धती अवलंबली जात होती. त्यामध्ये अनेकदा महावितरणकडून वेळेवर बिले यायची नाहीत. त्यामुळे पालिकेला बिलामध्ये मिळणारी एक टक्क्याची सवलत मिळत नव्हती, तसेच बिल भरण्याची मुदत उलटून गेल्याने अनेकदा दंड भरावा लागत होता.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत बोलणी केली. महावितरण कंपनीची महापालिका सर्वात मोठी ग्राहक असल्याने पालिकेसाठी बिल भरण्यासाठी चांगली सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. महापालिकेची सर्व २९०० बिले
एकाच वेळी मिळण्याची मागणी महावितरणकडे करण्यात आली. तांत्रिक कारणास्तव सर्व २५ डिव्हिजन आॅफिसकडून एका वेळी बिले
निघू शकत नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र एकाच डिव्हिजन आॅफिसमधील बिले एकाच वेळी उपलब्ध
करून देण्याचे मान्य केले. त्यानुसार प्रत्येक डिव्हिजन आॅफिसअंतर्गत येणारी बिले एकत्र करण्यात आली आहेत.
महापालिकेची मुख्य इमारत व इतर विभागीय कार्यालयातील इमारती, सर्व रस्त्यांवरील लाईट, उद्याने, दवाखाने, शाळांमधील लाईट बिलांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या बिलांसाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Web Title: Power saving of 25 lakhs of electricity bill for the month of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.