शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगरमध्ये सत्तापरिवर्तन

By admin | Updated: August 7, 2015 00:47 IST

वालचंदनगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत प्रगती पॅनलला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले. स्थापनेपासून राष्ट्रवादी पुरस्कृत

वालचंदनगर : वालचंदनगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत प्रगती पॅनलला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले. स्थापनेपासून राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलची सत्ता होती. काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलने ८ जागा जिंकल्या आहेत. आता ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी बसपाचा १ आणि ३ अपक्षांवर मदार आहे. सर्वाधिक जागा काँग्रेस पुरस्कृत पॅनलने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलपुरस्कृत अंबादास शेळके, रंजना कांबळे, मनीषा खंडागळे, अलका इंगळे, सुहास हिप्पारकर हे पाच जण उमेदवार निवडून आले. तर काँगेसप्रणीत परिवर्तन पॅनलचे नितीन मोरे, संतोष गायकवाड, उज्ज्वल्ला अशोक कांबळे, पद्मिनी परीट, योगेश साबळे, महादेवी कोळी, संदीप पांढरे, छाया मोरे असे ८ उमेदवार निवडून आले आहेत. अपक्ष विजयी झालेल्या उमेदवारांवर राष्ट्रवादी-काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा केला आहे. या वेळी अनिल वाघेला, सुरेखा सोनटक्के, वैशाली मिसाळ, बहुजन समाज पार्टीचे हर्षवर्धन गायकवाड असे ४ जण विजयी झाले आहेत. त्यांच्याच हाती सत्तेची दोरी राहणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वालचंदनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलला विजय मिळाला होता. यामध्ये वालचंदनगर कंपनीतील कामगारांचे मतदान महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील कामगारवर्ग काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलकडे झुकल्याचे दिसून आले. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला सत्तेपासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. येथील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. आमदार दत्तात्रय भरणे यांनीदेखील वालचंदनगरवर सत्ता राहावी, यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र, मतदारांनी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलला झुकते माप दिले. निंबोडी : प्रवीण घोळवे, रविंद्र भोईटे, ताराबाई घोळवे, संतोष घोळवे, इंदूबाई घोळवे, संगीता निकम, रमेश घोळवे, कमल वाघमारे, केशर घोळवेनिरगुडे : वसंतराव काजळे, नंदा खंडाळे, सिताबाई लकडे, ब्रह्मदेव केकाण, ज्ञानेश्वर काजळे, अलका केंजळे, रमेश रणधीर, चैत्राली सोनवणे, कविता केकाणनिरवांगी : निलम गुरव, गोपाळ रासकर, विजया कांबळे, महेश रासकर, दशरथ पोळ, मनिषा सूर्यवंशी, शंकर शिंदे, केशरबाई जाधव, रेखा मानेपिटकेश्वर : संजय कांबळे, विजय येरळकर, उषा येरळकर, रामदास राऊत, सुशिला भिसे, शोभा भोंग, अतुल म्हस्के, सविता अभंग, कमल झगडेरेडा : उत्तम पवार, ब्रह्मदेव देवकर, द्रोपदा देवकर, सचिन देवकर, नंदा माने, शर्मिला देवकर, रामचंद्र मोहिते रुक्मिणी अडसूळ, विमल गायकवाडरूई : बबन मारकड, बापूराव लावंड, जिजाबाई मारकाड, रुपाली कांबळे, कविता साळुंके, अमोल मराडे, छबा कांबळे, वर्षा पाटील, अजिनाथ मारकड, काका पांढरमिसे, उषा थोरातसणसर : नानासाहेब निंबाळकर, संगिता निंबाळकर, गजेंद्र मोरे, सिमा चव्हाण, माधुरी नरुटे, अक्षय काटकर, अभयसिंह निंबाळकर, शोभा निंबाळकर, यजूवेंद्र निंबाळकर, अरुणा खवळे, शरद कांबळे, संध्या नाळे, कामिनी चव्हाण, श्रीनिवास कदम, ललिता गायकवाड, सारिका पवार