‘लोकमत दीपोत्सव’ प्रकाशन सोहळा स्थगित
By Admin | Updated: October 21, 2016 04:49 IST2016-10-21T04:49:07+5:302016-10-21T04:49:07+5:30
संपादन, पृष्ठरचना, मुद्रण आणि वितरण अशा सर्वच आघाड्यांवर प्रयोगशीलतेची मुद्रा उमटवणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव’चा पुण्यात शुक्रवारी होणारा प्रकाशन सोहळा काही

‘लोकमत दीपोत्सव’ प्रकाशन सोहळा स्थगित
पुणे : संपादन, पृष्ठरचना, मुद्रण आणि वितरण अशा सर्वच आघाड्यांवर प्रयोगशीलतेची मुद्रा उमटवणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव’चा पुण्यात शुक्रवारी होणारा प्रकाशन सोहळा काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित करण्यात आला आहे.
आरएमडी सिंहगड स्कूल आॅफ इंजिनिअरिंग येथे दुपारी साडेचार वाजता हा सोहळा रंगणार होता. ‘दीपोत्सव’ या वर्षी दीड लाख प्रतींकडून दोन लाखांकडे झेपावतो आहे. महाराष्ट्रात सर्वत्र अंक उपलब्ध असून deepotsav.lokmat.com या संकेतस्थळावर आॅनलाइन पेमेंटद्वारे प्रती खरेदी करून भारतभरात कुठेही पाठवता येतील.