शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला पुन्हा खो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:59 IST

बाजार समितीच्या निवडणुका आता पुन्हा जुन्या पध्दतीनुसार म्हणजे विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सद्सय निवडून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार अखेर रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णयअद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला नसला तरी मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द

पुणे : राज्यातील तत्कालीन भाजप-सेना सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी आणि शेतीमाल उत्पादकांना मतदानाचा दिलेला अधिकार बुधवारी (दि.२२) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीच्या निवडणुका आता पुन्हा जुन्या पध्दतीनुसार म्हणजे विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सद्सय निवडून करण्यात येणार आहे. यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सुरु केलेली प्रक्रिया थांबविण्यात येणार आहे. यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीला पुन्हा एकदा खो बसला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला नसला तरी मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी आवश्यक असलेले गण निश्चित व गणांचे आरक्षण जाहिर केले आहे. त्यानंतर प्रत्येक गणनिहाय मतदार निश्चित करुन १२ फेब्रुवारी रोजी प्रारुप मतदार यादी जाहिर करणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी बाजार समितीच्या निवडणूक कायद्यात बदल केला तर ही निवडणूक प्रक्रिया थांबणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीमाल उत्पादकांना असणारा मताधिकार रद्द करून तो पुन्हा पूर्वीप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटी यांच्या सदस्य मंडळांना मतदार म्हणून अधिकार देणारा वटहुकूम किंवा शासन निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला होता. अखेर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित असाच निर्णय घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्या दृष्टीने अध्यादेश प्रख्यापित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुन्हा लांबणीवर पाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

टॅग्स :PuneपुणेAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रFarmerशेतकरी