शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडियाच्या युगात '' पोस्ट पेटी '' काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:21 IST

जवानांपासून ते कंदीलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली आखादी म्हताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा.

रांजणगाव सांडस : लहानपणी नातेवाईकांचे आलेले पत्र वाचण्यात मोठी मजा होती. तसेच  पत्राला स्वत:च्या हाताने कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनातील भावना स्वत:च्या हाताने पत्रात उतरवून पाठवलेले उत्तर अजूनही ठळकपणे नजरेसमोर येते. तसचे लग्नपत्रिका, दु:खद बातमी, आमंद वार्ता असे सगळेकाही चालायचे ते टपालपेटीमार्फत.. जवानांपासून ते कंदीलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली आखादी म्हताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा.शहरापासून ते ग्रामीण भागातल्या छोट्या छोठ्या खेडे गावे वाड्या वस्त्यांना जोडणारा दुवा म्हणजे भारतीय टपालसेवेची टपाल पेटी '' डिजिटल इंडिया'' च्या युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावाकडे पोस्टमन पत्र घेऊन आला तर लोकांच्या मनामध्ये संमिश्र भावना दाटून येत असे. गावातला पोस्टमन आपल्या सुख दुःखाच्या बातम्या कळवतो म्हणून त्याच्यावर घरातल्या माणसाइतकाच प्रेम करायचे. तो ही मोबाईलच्या व्हाट्सअप ,फेसबुक यांच्या युगात फक्त एक आठवणींचा कप्पा बनून राहिल्या आहेत. पूर्वी नोकरीचे कॉल लेटर टपालाद्वारे घरपोच मिळत असे ,परंतु अलीकडील काळात ई-मेल ,मोबाईल, फेसबुक ,व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे भारतीय टपाल सेवा गावाकडील भागात पूर्णपणे  बंद झाल्यात जमा झालेले आहे. 

मागील काही वर्षांपर्यंत ग्रामपंचायत सह सर्व सरकारी कार्यालयांतील कागद पत्रे ही पोस्ट मार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या कडे पाठविली जायची. परंतु,  अलिकडच्या  काळात इंटरनेट, व्हॉट्स, जीमेल यांच्या माध्यमातून ऑनलाईन माहिती त्वरित उपलब्ध झाल्यामुळे टपाल सेवा यांत्रिकीकरणाच्या युगात कमी झाली आहे. त्यामुळे गावांचा विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. .सौ .शारदा श्यामकांत रणपिसे   (माजी आदर्श सरपंच राजन गाव सांडस )

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिसdigitalडिजिटल