शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

‘आपले सरकार’ पोर्टल ‘अँक्टिव्ह’, वर्षाहून अधिक काळ प्रलंबित प्रकरणाचा निपटारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 02:31 IST

वर्षाहून अधिक काळ प्रलंबित प्रकरणाचा निपटारा : तक्रारदारांना भरपाई मिळण्यात यश

नम्रता फडणीसपुणे : नागरिकांच्या तक्रारी विशिष्ट वेळेत सोडविण्यासाठी सुरू केलेले ‘आपले सरकार’ तक्रार निवारण पोर्टल ‘आॅफलाइन’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’ केले आहे. विशेष म्हणजे, पोर्टलवर काही महिन्यांपासून व वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागांच्या कारवाईमुळे तक्रारदारांना भरपाई मिळण्यात यश आले आहे. तरीही खासगी शाळांकडून सुरू केलेल्या बेकायदा शुल्कवसुलीसारख्या गंभीर प्रकरणांची अद्याप दखल घेण्यात न आल्याने नाराजीचा सूर कायम आहे.

शासनाने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुरू केलेले ‘आपले सरकार’ पोर्टल ‘आॅफलाइन’ झाले आहे. २१ दिवसांच्या आत तक्रारींचे निवारण करणे अपेक्षित असताना अनेक तक्रारी काही महिन्यांपासून तसेच एका वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असल्याने या पोर्टलला ‘आपले सरकार’ म्हणायचे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्वरूपाचे वृत्त आॅक्टोबर २०१८मध्ये ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले होते. ‘देर आए, दुरुस्त आए’ या उक्तीनुसार शासनस्तरावर या वृत्ताची दखल घेऊन हे पोर्टल पुन्हा कार्यान्वित केले असून, त्यातील काही तक्रारदारांना संबंधित विभागांच्या कारवाईमुळे नुकसानभरपाई मिळाली.नागरिक व प्रशासन यांच्यामध्ये सेतू निर्माण करण्यासाठी ‘आपले सरकार’ हा महत्त्वाचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सरकारने सुरू केला. पोर्टलवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर २१ दिवसांत (कार्यालयीन दिवसांमध्ये) तक्रारीचे निवारण करणे संबंधित विभागांसाठी बंधनकारक केले आहे. मात्र, या पोर्टलद्वारे २१ दिवसांत तक्रार निवारण करणे तर सोडाच; पण कित्येक महिने व काही तक्रारी या वर्षाहून अधिक काळ प्रलंबित ठेवल्या जात असल्याच्या प्रकार समोर आला होता. कित्येक नागरिकांना त्यांच्या तक्रारी या ‘प्रलंबित’ किंवा ‘प्रक्रिया’ सुरू आहे, या वर्गात दाखविल्या जात असल्याने केवळ गाजावाजा करण्यासाठी हे पोर्टल सुरू झाले का, असा प्रश्न नागरिकांना पडला.नागरिकांना त्यांची तक्रार बसल्याजागी आॅनलाइन पद्धतीने दाखल करता यावी, असा या पोर्टलचा उद्देश आहे. ‘आपले सरकार’ ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागाबरोबरच राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. तक्रार निवारणाचा कालावधी २१ कार्यालयीन दिवसांचा ठरविण्यात आला आहे. राज्यभरातील कोट्यवधी जनतेची लालफितीच्या कारभारातून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘आपले सरकार’ या पोर्टलचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. या पोर्टलचे सामान्य जनतेकडून स्वागत झाले. मात्र, हे पोर्टल नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले.या तक्रारींचे २१ दिवसांत समाधानकारक निवारण न झाल्यास नोडल अधिकारी यांना संपर्क करण्याची अथवा उच्चपदस्थ अधिकारी यांना संपर्क करण्याचीही तरतूद करण्यात आली होती. परंतु, अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात आले. तर, काही वेळा अधिकाºयांकडून दिशाभूल केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’ने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शासनस्तरावर हालचाली होऊन हे पोर्टल सक्रिय झाले असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.मी सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असून, नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आमच्यासाठी ही रक्कम खूप मोठी होती. एका फर्मने थेट वेबसाईटवर सरकारी नोकरीची जाहिरात सर्रासपणे केल्याने माझा त्यावर विश्वास बसला. मात्र, पोलिसांत व आपले सरकार पोर्टलवर तक्रार करूनही न्याय मिळत नव्हता. अखेरीस आवाज उठविल्यानंतर मला न्याय मिळाला आहे. संबंधित फर्मने वेबसाईटवरून सरकारी नोकरीच्या आमिषाच्या जाहिरातीही काढून टाकल्या असून, वसूल केलेले रु. ६५ हजार रूपये परत केले आहेत. पुढील तपासही पोलीस प्रशासन चालू ठेवत आहे. माझे पैसे परत मिळाले व इतर कुणाची आता फसवणूक होणार नाही, हे चित्र समोर आल्याने न्याय मिळाला.-वैभव जाधव, अभियांत्रिकीचा विद्यार्थीआपले सरकार तक्रार निवारण पोर्टलवर एका खासगी शाळेकडून बेकायदा फीसंदर्भातील तक्रारींसह कित्येक तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, आजतागायत एकाही तक्रारीचे समाधानकारक निवारण झालेले नाही. अजूनही ’अंडर प्रोसेस’ दाखवत आहेत. मोठ्या तक्रारींचा निपटारा झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी हे पोर्टल सुरू केले; पण त्याचा आढावा घेतला जात नाही असे दिसून येते.पोर्टल सांभाळणारे त्याच्याकडे लक्ष देतात का? जनतेने काय प्रतिक्रिया दिल्या आहेत? याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे.- प्रसाद तुळसकर, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई’लोकमत’मधील वृत्ताच्या दणक्यामुळे हे पोर्टल पुन्हा कार्यान्वित झाले आहे. माझ्या अन्न भेसळीसंदर्भातील तक्रारीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यांना नोटीस पाठविली असून, त्यांना अहवाल मागितला आहे. दुसरा तक्रारदार वैभव वाघ यालाही पैसे परत मिळाले आहेत.- अ‍ॅड. सिद्धार्थ शर्मा

टॅग्स :Puneपुणे