शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 09:40 IST

‘बाळा’चे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यालादेखील पोलिस जबाबासाठी म्हणून घरातून पोलिस आयुक्तालयात घेऊन आले होते. या प्रकरणी त्याने नातवाला वाहन चालवण्यासंदर्भात मुभा दिली होती का, याबाबत पोलिसांनी चौकशी केली.  पोलिसांनी त्याला दिवसभर पोलिस आयुक्तालयात बसवले होते.

पुणे : कल्याणी नगर येथील पोर्शे कारअपघात प्रकरणानंतर ‘बाळा’ची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, तर ‘बाळा’चे वडील विशाल अग्रवाल याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी पोलिसांचे पथक विशाल अग्रवाल याला बरोबर घेऊन त्याच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी गेले होते. यावेळी विशाल अग्रवाल वापरत असलेला मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ‘बाळा’कडून गुन्हा घडला, त्यावेळी ‘बाळा’चा बाप घरातच होता. मात्र, त्याने पोलिसांना शिर्डीला असल्याची बतावणी केली होती. त्यामुळे झाडाझडती घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

‘बाळा’चे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यालादेखील पोलिस जबाबासाठी म्हणून घरातून पोलिस आयुक्तालयात घेऊन आले होते. या प्रकरणी त्याने नातवाला वाहन चालवण्यासंदर्भात मुभा दिली होती का, याबाबत पोलिसांनी चौकशी केली.  पोलिसांनी त्याला दिवसभर पोलिस आयुक्तालयात बसवले होते.

‘बाळा’ने ड्रग्ज घेतल्याची चर्चा- अल्पवयीन मुलाने ड्रग्जचे सेवनदेखील केले असल्याची चर्चारंगत आहे. - अजून ‘बाळा’चा रक्ताचा अहवाल आला नसल्याने त्यावर अधिकृत भाष्य पोलिस करू शकत नसले, तरी पबमध्ये मद्यसेवन करत असताना व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ‘बाळा’चे एक कृत्य ड्रग्ज सेवन करतानाचे असल्याचे बोलले जात आहे. 

अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल- या घटनेच्या अनुषंगाने, सोशल मीडियावर गुरुवारी दुपारी ‘मी बिल्डरचा मुलगा आहे, माझ्या मागे का लागता,’ अशा आशयाचा अश्लील भाषेत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. - मात्र, पोलिसांनी संबंधित व्हिडीओमधील मुलगा जरी या अपघात प्रकरणाबाबत बोलत असला तरी तो मुलगा आरोपी ‘बाळ’ नसल्याचे स्पष्ट केले.

अग्रवालबरोबर असलेल्या व्यक्तीची पत्रकारांशी अरेरावी -- पोलिस आयुक्तालयात ‘बाळा’च्या आजोबाला एका केबिनमधून चौकशीसाठी दुसरीकडे नेण्यात आले. - यावेळी ‘बाळा’च्या आजोबाची, त्याच्या मुलाची (विशाल अग्रवाल) आणि चालकाची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली.- यावेळी सुरेंद्रकुमार अग्रवाल याच्याबरोबर असलेल्या एकाने स्वत:ला वकील असल्याचे सांगून पत्रकारांशी अरेरावीची भाषा केली. - याआधी त्याच व्यक्तीने पत्रकार बाजूला असल्याचे लक्षात येताच, ‘हे कोण गरीब लोक आहेत, यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का?, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळे सॉल्व्ह होईल, त्यांच्या नादी का लागत आहेत?’ असे वक्तव्य केले होते. - यानंतर संध्याकाळी परत त्याने पत्रकारांशी अरेरावी केली व पत्रकारांच्या अंगावर धावून गेला. 

टॅग्स :Porscheपोर्शेcarकारAccidentअपघातPoliceपोलिस