शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Porsche car crash case: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील दहा आरोपींची हाेणार एकत्रित चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:33 IST

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दहा आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार

पुणे : कल्याणीनगर अपघातप्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दहा आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार आहे. याबाबत तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी बुधवारी (दि. ४) न्यायालयात अर्ज केला असून, विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी पोलिसांना चौकशी करण्यास परवानगी दिली आहे.मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल (दोघे रा. वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, कारमध्ये मागे बसलेल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःचे रक्ताचे नमुने देणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२ वर्षे, रा. घोरपडी), आशिष मित्तल (वय ३७, रा. विमाननगर) आणि अरुणकुमार सिंग हे दहा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नऊ आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर आशिष मित्तलला रक्त देण्यास सांगणाऱ्या अरुणकुमार देवनाथ सिंग याच्याविरोधात अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे.दरम्यान, अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करण्यासाठी सात आरोपी डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना आणखी काय देणार होते? त्यांना आणखी कोणती आश्वासने दिली होती? याबाबत पोलिसांना चौकशी करायची आहे. त्यामुळे कारागृहात जाऊन सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करण्यासाठी तपास अधिकारी यांना न्यायालयाने मंजुरी दिली आहे.ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी डिस्चार्ज साठी, तर आशिष मित्तल याने खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यासाठी बुधवारी न्यायालयात अर्ज केला असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPorscheपोर्शेAccidentअपघातCourtन्यायालय