शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

पोर्शे कार अपघात प्रकरण : आरोप निश्चितीच्या मुद्द्यावर बचाव पक्षांचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 20:14 IST

- आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली कागदपत्रे ही'मूल्यवान रोखाचा दस्तऐवज'या संकल्पनेच्या कक्षेत येत नाही

पुणे : पोर्श’ कार अपघात प्रकरणी आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली कागदपत्रे ही ' मूल्यवान रोखाचा दस्तऐवज' या संकल्पनेच्या कक्षेत येत नाही असा युक्तिवाद ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर चे वकील अँड ऋषीकेश गानू यांनी मंगळवारी न्यायालयात केला.कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघात प्रकरणात मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळे मार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे

शिवाजीनगर सत्र न्यायालयात क्षीरसागर कोर्टात सरकारी पक्षांच्या युक्तिवादानंतर बचाव पक्षाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी ( दि. ८) डॉ. श्रीहरी हाळनोर यांचे वकील अँड. ऋषीकेश गानू यांच्यासह आरोपी आदित्य सूद चे वकील अँड सुदीप पासबोला यांचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे तसेच अश्पाक मकानदारचे वकील अँड राजेश काळे यांचा युक्तिवाद झाला.

अँड ऋषीकेश गानू यांनी युक्तिवादात 'दस्तऐवज ' व ' मूल्यवान रोखाचा 'दस्तऐवज' या दोन संकल्पनांमध्ये स्पष्ट फरक आहे असे सांगून दोन्ही संज्ञाची व्याख्या मांडली. त्यांनी अंमलबजावणी योग्य अधिकार आणि मौल्यवान सुरक्षा या संदर्भात सखोल विवेचन केले. तसेच कुठल्या कलमांतर्गत आरोप आहेत? ही कलमे कोणती आहेत, त्याचा मसुदा दिला गेला. पण मसुद्यामधील कलमे कशी लागू नाहीत त्याच्या तपशीलाबाबत विस्तृत मांडणी केली.

अश्पाक मकानदार च्या वतीने अँड राजेश काळे यांनी युक्तिवाद केला की भारतीय दंड विधानातील कलम ३४ व १२० हे एकत्र लागू शकत नाहीत. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ व ७ अ हे लागू होत नाही. कारण आरोपपत्रात विशिष्ट मागणी दाखवलेली नाही. तसेच त्या कलमांचे आवश्यक घटक पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मौल्यवान सुरक्षा व दस्तऐवज या मुद्द्यांवर मसुदा आरोप योग्य प्रकारे नव्याने विचारात घेण्याची गरज आहे.

आदित्य सूद चे वकील अँड. सुदीप पासबोला यांनीही युक्तिवाद केला. भारतीय दंड विधान कलम १०९ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ७ व ७ अ लागू होत नाहीत. तसेच बनावट दस्तऐवज तयार करण्यासंबंधीचे आरोप देखील लागू होत नाहीत. आरोप स्पष्ट नसून, सर्व आरोपींवर विशिष्टपणे कोणतीही कलमे लागू होत नाहीत असे त्यांनी नमूद् केले. दरम्यान, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या प्रकरणातील सीडीआर न्यायालयात सादर केले. पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार असून, हिरे हे बचाव पक्षांच्या युक्तिवादांना उत्तर देतील.

आई आजारी असल्याने विशाल अगरवाल चा जामिनासाठी अर्ज

मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPorscheपोर्शे