शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

महापालिकेच्या लोकसंख्येत झाली १० लाखांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 22:00 IST

गेल्या दोन वर्षांत शहराच्या लोकसंख्येत तब्बल १० लाखांना वाढ होऊन ती ५० लाखांवर गेली आहे.

ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरा विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल पाषाण, कात्रज तलावाचा वापर शक्य नाही !

पुणे : काही महिन्यांच्या अंतराने पुणे शहराच्या लोकसंख्येत लाखांची भर पडत आहे. गेल्या दोन वर्षांत शहराच्या लोकसंख्येत तब्बल १० लाखांना वाढ होऊन ती ५० लाखांवर गेली आहे. पुणे शहराला सध्या मंजुर असलेला वार्षिक कोटा ११.५० अब्ज घनफुटावरुन (टीएमसी) १५.८५ टीएमसी मिळावा यासाठी लोकसंख्येची गणिते वारंवार बदलली जात आहेत. पाण्याची गळती, व्यावसायिक, औद्योगिक पाणी वापर, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, हॉटेल्स आणि हॉस्पिटलचा पाणी वापर गृहीत धरुन वाढीव पाणी कोटा देण्याची गरज असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरा विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल झाली आहे. महाराष्ट्र सरकार आणि महापालिका प्रतिवादी आहेत. त्यात महापालिकेने आपली बाजू मांडताना लोकसंख्या आणि त्यासाठी आवश्यक पाण्याची माहिती दिली आहे. या पुर्वी सप्टेंबर २०१७मध्ये पुणे शहराला लोकसंख्येच्या नुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराला पाणी कमी देणे परवडणारे नसल्याने, राज्य सरकारने १३०० ते १३५० दशलक्ष लिटर पाणी वापराची सूचना दिली होती. सध्या शहराचा पाणी वापर १३०० ते १४०० एमएलडी दरम्यान आहे. हा पाणी वापर वार्षिक सोळा ते साडेसोळा टीएमसी होतो. महापालिकेने पाणी वापराची गरज अधोरेखित करताना ३५ ते ४० टक्के होत असलेली पाणी गळती, महापालिकेला शहर हद्दीलगतच्या ५ किलोमीटर अंतरातील गावांना करावा लागणारा पाणी पुरवठा, शहरातील वाढलेली लोकसंख्या, समाविष्ट गावे, शाळा-महाविद्यालये, हॉस्पिटल्स, विमानतळ, पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड, तसेच मोठ्या सोसायट्यांना अग्नीशमनासाठी ठेवावा लागणारा राखीव पाण्याचा कोटा, दहा टक्के तरती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) याचा विचार केल्यास शहराला ११.५० टीएमसी पाणी देणे शक्य नाही. शहराची तहान भागविण्यासाठी दररोज किमान १२३० एलएलडी (वार्षिक १५.८५ टीएमसी) पाणी आवश्यक असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ----------------------

पाषाण, कात्रज तलावाचा वापर शक्य नाही !शहर हद्दी लगत असलेल्या पाषाण आणि कात्रज येथील तलावांची क्षमता ही अत्यंत तोकडी आहे. तसेच, या तलावांमध्ये मैलापाणी सोडले जात असल्याने हे पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीCourtन्यायालय