शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

रंगांची उधळण करीत धुळवडीत पुणेकर चिंब

By admin | Updated: March 7, 2015 00:19 IST

लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी धुळवडीचा आनंद लुटला. शहरामध्ये अनेक रंगांमध्ये रंगलेल्या तरुण-तरुणींचे जथे फिरताना दिसून येत होते.

पुणे : होळीच्या शुभेच्छा देत एकमेकांवर विविध रंगांची बरसात करीत, चित्रपटांतील गाण्यांवर ताल धरून नाचत, पाण्यामध्ये चिंब होत, सामिष भोजनाचा आस्वाद घेत शहरात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी धुळवडीचा आनंद लुटला. शहरामध्ये अनेक रंगांमध्ये रंगलेल्या तरुण-तरुणींचे जथे फिरताना दिसून येत होते. विश्वचषकातील भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघाची लढत दुपारपासून सुरू होणार असल्याने सकाळी लवकरच रंग खेळण्यास सुरुवात झाली. लहान मुलांमध्ये रंग खेळण्याचा विशेष आनंद दिसून येत होता. गटागटाने एकत्र फिरून मित्र-मैत्रिणींना रंग लावला जात होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयातील मुले-मुली एकत्र येऊन धूलिवंदन साजरे केले.उत्तरेकडच्या राज्यांमध्ये धूलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते, तिकडून पुण्यात शिकायला तसेच नोकरीच्या निमित्ताने आलेल्या तरुण-तरुणी, कुटुंबीय ठरवून एकत्र आले होते. गाण्यांच्या तालावर नृत्य करीत, एकमेकांना रंगांत भिजवून काढून मोठ्या उत्साहात धूलिवंदन साजरे करण्यात आले. अनेक रंगांत रंगल्यामुळे चेहरेही ओळखू येत नसलेल्या तरुण-तरुणी दुचाकींवरून गटागटाने रस्त्यांवरून फिरताना दिसून येत होते. शासकीय कार्यालयांना सुट्टी असली तरी खासगी कार्यालये काही ठिकाणी सुरू होती. त्याठिकाणी सहकाऱ्यांना रंग लावून आनंद लुटण्यात आला. रंग लावण्यावरून काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार घडल्याचे दिसून आले. अनाथ, वंचित मुलांचे ‘रंग बरसे’पुण्यातील शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने वंचित, अनाथ मुलांसमवेत होळीचा सण साजरा करण्यात आला. अनाथ मुलांसमवेत होळी साजरी करण्याचे प्रतिष्ठानचे हे १८ वे वर्ष होते. रास्ता पेठेतील आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनाथ, अपंग, अंध, एचआयव्हीग्रस्त, मूकबधिर, देवदासींची मुले, फुगे विकणारी अशी ८०० मुले या उत्सवामध्ये सहभागी झाली होती. गाण्यांच्या तालावर नृत्य करीत त्यांनी धूलिवंदन साजरे केले. अपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, उपायुक्त एम. बी. तांबडे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भोई प्रतिंष्ठानचे मिलिंद भोई यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.ममता फाउंडेशन, येवलेवाडी तसेच जनसेवा फाउंडेशन कात्रज या संस्थेतील एड्सग्रस्त व अनाथ मुलांसमवेत अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल यांनी याचे आयोजन केले होते. या वेळी सागर आरोळे, संतोष पवार, धनंजय कांबळे, योगेश निकाळजे, विजय बिबवे उपस्थित होते.