शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पुलंच्या आठवणीत रमला ‘मास्टर ब्लास्टर’...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 03:25 IST

सचिन तेंडुलकरही ‘पुलकित’ : सर्वसामान्यांशी ‘कनेक्ट’ होणे भावले

पुणे : ‘‘माझे वय पाच ते सहा वर्षांचे असेल... बान्द्र्याच्या साहित्य सहवासमध्ये पुल आले होते. मी त्यांची सही घेण्यासाठी रांगेत उभा होतो. ... त्यानंतर २३व्या वर्षी पुन्हा पुलंना भेटण्याचा योग आला. ...पुलंनी मला बोलावले होते. आवडत्या सारस्वत जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला. ...अशा पुलंच्या आठवणींचा गुलदस्ता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने उलगडला. उलगडत होता. डॉन ब्रँडमन यांच्या ९८ व्या वाढदिवसाच्या दिवशी आॅस्टेÑलियाला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो.’’ ...आज तशीच काहीशी भावना झाली असल्याचे त्याने प्रांजळपणे सांगितले.

सचिनच्या हस्ते ‘ग्लोबल पुलोत्सव’च्या लोगोचे अनावरण शुक्रवारी झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, पुलंचे भाचे दिनेश ठाकूर, ज्योती ठाकूर, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, कृष्णकुमार गोयल, मिलिंद काळे आदी उपस्थित होते.पिवळा कुडता... पायात कोल्हापुरी चपला अशा मराठमोळ्या वेशभूषेत सचिनने ‘मालती माधव’मध्ये प्रवेश केला. पुलंच्या छायाचित्रासमोर त्याने हात जोडले. ज्योती ठाकूर व विजय मर्चंट यांनी पुलंना लिहिलेल्या पत्रांची माहिती दिली.सचिन म्हणाला..माझे बाबा आणि पुल चांगले मित्र होते. बाबांनी मला पुलंची अनेक पत्रे दाखवली आहेत. घरामध्ये पुलंबद्दल सातत्याने बोलले जायचे. त्यांच्याविषयी कुठलीही गोष्ट ऐकली की चेहऱ्यावर हमखास हास्य फुलायचे.पुल सामान्य माणसाशी कनेक्ट व्हायचे. सर्वसामान्यांशी कनेक्ट होणं ही एक दैवी देणगी असते. तुम्ही तुमच्या करिअरच्या वाटेत कितीही प्रगती करत असाल. परंतु तुम्ही ज्या क्षेत्रात प्रगती करत आहात त्या कलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तुम्ही किती आनंद मिळवून देता, हे खूप महत्त्वाचे आहे. पुलंनी सातत्याने त्यांच्या साहित्यनिर्मितीतून सर्वसामान्यांना आनंद दिला. आमच्या पिढीने त्यांच्या साहित्यकृतीचा आनंद घेतला आहे.४आता सीडी वगैरे गोष्टी मागे पडल्या आहेत आणि डिजिटल युग अवतरलेआहे. आज पाच ते दहा सेकंदात कुठलीही गोष्ट तत्काळ उपलब्ध होते. पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’ची संधी न दवडता तरुण पिढीने त्याचा आस्वाद घ्यावा. आयुष्यभर त्यांच्या आठवणींचा सुगंध दरवळत राहतो. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरPuneपुणे