शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

चाकण नगराध्यक्षपदी पूजा कड

By admin | Updated: November 25, 2015 01:05 IST

ग्रामपंचायतीनंतर प्रथमच अस्तित्वात आलेल्या चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सर्वांत तरुण युवती, आर्किटेक्ट पूजा साहेबराव कड यांची

चाकण : ग्रामपंचायतीनंतर प्रथमच अस्तित्वात आलेल्या चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सर्वांत तरुण युवती, आर्किटेक्ट पूजा साहेबराव कड यांची, तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र दत्तात्रय गोरे यांची निवड करण्यात आली. चाकण नगर परिषदेवर खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भगवा फडकला.नगराध्यक्षपदाची निवडणूक कडेकोट पोलीस बंदोबस्तात आज नगर परिषदेच्या कार्यालयात पार पडली. शिवसेनेकडून कड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीकडून वृषाली योगेश देशमुख यांनी, तर अपक्षांपैकी उमेदवार मंगल विनोद गोरे यांनी अर्ज दाखल केला. कड यांना शिवसेनेचे आठ, अपक्ष सहा व भाजपा एक अशा एकूण १५ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले, तर देशमुख यांना केवळ राष्ट्रवादीच्याच सात जणांनी मतदान केले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे यांनी कड निवडून आल्याचे घोषित केले. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे जीवन सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे राजेंद्र गोरे हे उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. चाकण नगर परिषदेचे अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अशोक साबळे, मंडलाधिकारी राजाराम मोराळे, तलाठी अशोक सुतार यांनी सहकार्य केले.यावेळी नगरसेवक प्रकाश लक्ष्मण गोरे, मंगल गोरे, हृषिकेश चंद्रकांत झगडे, स्नेहा वसंत भुजबळ, अश्विता प्रकाश लांडे, अनिता दिलीप कौटकर, स्नेहा नितीन जगताप, शेखर श्रीराम घोगरे, सुरेखा मनोहर गालफाडे, किशोर ज्ञानोबा शेवकरी, मेनका सागर बनकर, सुदाम दामू शेवकरी, नीलेश बबन गोरे, प्रवीण शांताराम गोरे, संगीता दत्तात्रय बिरदवडे, वृषाली योगेश देशमुख, हुमा जहीर आब्बास शेख, जीवन आनंदराव सोनवणे, प्रकाश राजाराम भुजबळ, धीरज प्रकाश मुटके उपस्थित होते.निवडीबद्दल सुरेश गोरे, प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे, पोलीस निरीक्षक दगडू पाटील व ग्रामस्थांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, शहरप्रमुख प्रीतम शिंदे, उपप्रमुख स्वप्नील बिरदवडे, उद्योजक साहेबराव कड, पांडुरंग गोरे, उपसरपंच बाळासाहेब कड उपस्थित होते. (वार्ताहर)