शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही

By admin | Updated: August 17, 2015 02:46 IST

शिरूरच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही याच बरोबर शहराच्या पाणी प्रश्नांसाठी व कचरा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले

शिरूर : शिरूरच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही याच बरोबर शहराच्या पाणी प्रश्नांसाठी व कचरा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.शहराचे हित व विकास या दृष्टिकोनातून पाहता शिरूर नगर परिषदेचे कौतुक केले पाहिजे, पक्षविरहित काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची सचोटी प्रकाश धारिवाल यांच्यात असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.शिरूर नगर परिषद नवीन प्रशासकीय इमारत व अग्निशामक केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन अनुक्रमे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बापट बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बाबूराव पाचर्णे, श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप, नगराध्यक्षा मनीषा गावडे, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार, पोपटराव गावडे, शिरूर शहर विकास आघाडीचे नेते प्रभाकर डेरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जि. प. सदस्या मनीषा कोरेकर, जिल्हा बँक संचालक निवृत्तीअण्णा गवारी, संचालिका डॉ. वर्षा शिवले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, घोडगंगाचे माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी नगराध्यक्षा सुनीता कालेवार, उज्ज्वला बारमेचा, अलका सरोदे, सुवर्णा लटांबळे, नगरसेवक जाकिरखान पठाण, प्रवीण दसगुडे, अशोक पवार, दादाभाऊ वाखारे, आबीद शेख, संतोष भंडारी, विजय दुगड, नगरसेविका सुवर्णा लटांबळे, संगीता शेजवळ, शैला साळवे, शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. प्र. रा. वळसंगे, सर्व सदस्य आदी या वेळी उपस्थित होते.पावसाअभावी निर्माण झालेल्या टंचाईग्रस्त, तसेच पाण्याच्या प्रश्नासंदर्भात अजित पवार यांच्या आवाहनानुसार बारीक लक्ष ठेवून काम करण्याचेही सूतोवाच बापट यांनी या वेळी केले. नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या प्राास्ताविकात शहराच्या विकासाचा आढावा घेतला. अजित पवार पालकमंत्री असताना इमारतींसाठी निधी मिळाला, आता फर्निचरसाठी विद्यमान पालकमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी अपेक्षा सभागृहनेते धारिवाल यांनी केली. नगरसेवक विजय दुगड यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक जाकिरखान पठाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)