शिरूरच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही

By Admin | Updated: August 17, 2015 02:46 IST2015-08-17T02:46:42+5:302015-08-17T02:46:42+5:30

शिरूरच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही याच बरोबर शहराच्या पाणी प्रश्नांसाठी व कचरा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले

Politics will not let politics in Shirur's development | शिरूरच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही

शिरूरच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही

शिरूर : शिरूरच्या विकासात राजकारण येऊ देणार नाही याच बरोबर शहराच्या पाणी प्रश्नांसाठी व कचरा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
शहराचे हित व विकास या दृष्टिकोनातून पाहता शिरूर नगर परिषदेचे कौतुक केले पाहिजे, पक्षविरहित काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची सचोटी प्रकाश धारिवाल यांच्यात असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शिरूर नगर परिषद नवीन प्रशासकीय इमारत व अग्निशामक केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन अनुक्रमे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बापट बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बाबूराव पाचर्णे, श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप, नगराध्यक्षा मनीषा गावडे, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार, पोपटराव गावडे, शिरूर शहर विकास आघाडीचे नेते प्रभाकर डेरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जि. प. सदस्या मनीषा कोरेकर, जिल्हा बँक संचालक निवृत्तीअण्णा गवारी, संचालिका डॉ. वर्षा शिवले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, घोडगंगाचे माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी नगराध्यक्षा सुनीता कालेवार, उज्ज्वला बारमेचा, अलका सरोदे, सुवर्णा लटांबळे, नगरसेवक जाकिरखान पठाण, प्रवीण दसगुडे, अशोक पवार, दादाभाऊ वाखारे, आबीद शेख, संतोष भंडारी, विजय दुगड, नगरसेविका सुवर्णा लटांबळे, संगीता शेजवळ, शैला साळवे, शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. प्र. रा. वळसंगे, सर्व सदस्य आदी या वेळी उपस्थित होते.
पावसाअभावी निर्माण झालेल्या टंचाईग्रस्त, तसेच पाण्याच्या प्रश्नासंदर्भात अजित पवार यांच्या आवाहनानुसार बारीक लक्ष ठेवून काम करण्याचेही सूतोवाच बापट यांनी या वेळी केले. नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या प्राास्ताविकात शहराच्या विकासाचा आढावा घेतला. अजित पवार पालकमंत्री असताना इमारतींसाठी निधी मिळाला, आता फर्निचरसाठी विद्यमान पालकमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी अपेक्षा सभागृहनेते धारिवाल यांनी केली. नगरसेवक विजय दुगड यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक जाकिरखान पठाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Politics will not let politics in Shirur's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.