‘ट्रिपल तलाक’चे राजकारण - सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 03:51 IST2018-02-05T03:51:25+5:302018-02-05T03:51:33+5:30

भारतातील महिलांना होणारा त्रास संपविण्यासाठीच केंद्र सरकारने ट्रिपल तलाक विधेयक आणले. त्यामुळे काँग्रेसने राज्यसभेतही या कायद्याला समर्थन द्यावे, अन्यथा त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल, असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी रविवारी केले.

Politics of Triple Divorce - Leo | ‘ट्रिपल तलाक’चे राजकारण - सिंह

‘ट्रिपल तलाक’चे राजकारण - सिंह

पुणे : भारतातील महिलांना होणारा त्रास संपविण्यासाठीच केंद्र सरकारने ट्रिपल तलाक विधेयक आणले. त्यामुळे काँग्रेसने राज्यसभेतही या कायद्याला समर्थन द्यावे, अन्यथा त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल, असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी रविवारी केले.
ट्रिपल तलाकबाबत पवारांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ते म्हणाले, पवार ज्येष्ठ नेते असून मला त्यांच्याबद्दल मला आदर आहे. जगभरातील २२ मुस्लिम देशांनी ट्रिपल तलाक कायदा संपुष्टात आणला आहे. त्या देशातही शरियत होते. आपल्या देशात ट्रिपल तलाकला सर्वाधिक विरोध करणारे राजकीय पक्षच आहेत. महिलांना त्रास द्यावा,असे शरियतमध्ये कुठेही लिहून ठेवलेले नाही.
यंदाच्या सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगाच्या तरतुदीत गेल्या वर्षाच्या तुलनेत ५९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगास अधिक चालना मिळणार असून कोट्यवधी हातांना रोजगार मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
>‘सोलर चरखा’ योजना
प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एका गावात ‘सोलर चरखा’ योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वत: च्या गावात ६ ते १० हजार रुपयांचा रोजगार सहज उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Politics of Triple Divorce - Leo