शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘गोविंदबागे’मध्ये राजकीय खलबते? साताऱ्याच्या आमदारांची पवार यांच्यासमवेत गुप्त चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 01:21 IST

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २४) सकाळी बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी राजकीय खलबते रंगली.

बारामती - आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २४) सकाळी बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी राजकीय खलबते रंगली.सोमवारी सकाळी झालेल्या चर्चेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र या भेटीचा तपशील पत्रकारांना सांगण्यास संबंधित आमदारांनी नकार दर्शविला.या बैठकीत पवार यांच्यासमवेत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदारशशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील उपस्थित होते. सकाळी अकराच्या सुमारास सर्वच आमदार गोविंदबाग येथे उपस्थित झाले. ही सभा अत्यंत गोपनीय असल्याने कोणालाच याबाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती. अचानक हे सर्व आमदार बैठकीसाठी पोहोचले. बारामतीमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारीदेखील या बैठकीबाबत अनभिज्ञ होते.या बैठकीत नेमके काय शिजले, याची माहिती गुप्त ठेवण्यात आली; मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबते झाल्याची चर्चा या वेळी होती. या बैठकीमुळे साताºयातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते पवार यांची राजकीय मुत्सद्देगिरी राजकारणात नेहमीच महत्त्वाची ठरते.या बैठकीत पवार यांनीसंबंधित आमदारांना कोणता कानमंत्र दिला, याबाबत मात्र आमदारांनी कमालीची गोपनीयता बाळगली.या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीविषयी चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीचा रोख खासदार उदयनराजे भोसले यांच्या दिशेने होता का, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे; मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही.या बैठकीबाबत आमदारांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिल्याने अधिक तपशील समजू शकला नाही. या वेळी बैठक संपल्यानंतर, सर्व आमदार साताºयाच्या दिशेने निघून गेले. मकरंद पाटील यांनी केवळ जिल्ह्याच्या विकासकामांबाबत काही प्रश्नांवर ‘साहेबां’ना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. दरम्यान, बैठकीनंतर पवार यांच्या गाडीत बसून रामराजे निंबाळकर व शशिकांत शिंदे पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचे येथील सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण