शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्लाझ्मा बॅगचा वापर नातेवाईक व मित्रमंडळींसाठी व्हावा म्हणून राजकीय नेत्यांचे प्रशासनावर दबावतंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 13:29 IST

धक्कादायक! ६० टक्केहून अधिक प्लाझ्मा बॅग खासगी रुग्णालयाला; उर्वरित ३० ते ४० टक्के बॅगचा वापर वायसीएम आणि महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी..

ठळक मुद्देवायसीएम रुग्णालयावर ताण :  खासगी हॉस्पीटलमधील रुग्णांसाठी सर्वाधिक मागणी  

तेजस टवलारकर- पिंपरी : शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी वायसीएम रक्तपेढीत दररोज जवळपास २० ते २५ प्लाझ्मा बॅग तयार होतात. मात्र, प्लाझ्मा बॅग खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राजकीय नेत्यांचे नातेवाईक व मित्रमंडळींसाठी वापर करण्यात यावा, अशी शिफारस करून प्रशासनावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे वायसीएममधील ६० टक्केहून अधिक प्लाझ्मा बॅग या खासगी रुग्णालयाला पुरविल्या जात आहेत. उर्वरित ३० ते ४० टक्के बॅगचा वापर वायसीएम आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयातील रुग्णांसाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.     कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील प्लाझ्मा बॅगला पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातील खासगी रुग्णालयांकडून मागणी आहे.   शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार वायसीएम रक्तपेढीकडून एका प्लाझ्मा बॅगसाठी नाममात्र ४०० रुपये घेतले जातात. प्लाझ्मा तयार करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते, त्यासाठी हे पैसे घेतले जातात. मात्र, खासगी रुग्णालयाकडून प्लाझ्मा थेरपीसाठी किती शुल्क आकारणी केली जाते, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.   खासगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसाठी नातेवाईक  वायसीएम रक्तपेढीतून प्लाझ्मा घेऊन जातात. परंतु सुरुवातीला याचे प्रमाण मागणी कमी होती. मात्र, प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्लाझ्मा बॅगची मागणी वाढली आहे. वाढलेल्या मागणीचा ताण हा वायसीएम रक्तपेढीवर येत आहे. रुग्णांचे नातेवाईक प्लाझ्मा थेरपी करण्याचा आग्रह धरत असल्याचे एका डॉक्टरांनी सांगितले. प्लाझ्मा मिळावा म्हणून काही लोक हे प्लाझ्मा दातेसुद्धा सोबत घेऊन येत आहेत. राजकीय नेते व नगरसेवक यांची  शिफारस, फोन  किंवा ओळख सांगूनसुद्धा प्लाझ्मा मिळविण्यासाठी धडपड केली जात आहे. वेळ प्रसंगी प्रशासनावर राजकीय दबाव आणून प्लाझ्मा बॅग मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याविषयी आरोग्य विभागाचे अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. -------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणFamilyपरिवार