शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार; पुणे पॅटर्न पुन्हा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 18:22 IST

आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार

पुणे :पुणे महापालिकेत २००७ साली काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिंदेसेनेला बरोबर घेऊन पुण्यात सत्ता आणली होती. हा पुणे पॅटर्न राज्यात गाजला होता. आता राज्यातील सरकारमध्ये भाजपबरोबर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पुणे महापालिकेतही हा पुणे पॅटर्न पुन्हा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.पुणे महापालिकेची २००७ साली निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे सुरेश कलमाडी यांना काँग्रेसमधील सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली. त्यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे तत्कालीन पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांना विश्वासात घेतले. पुणे महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजपला बरोबर घेऊन पुणे पॅटर्न तयार केला होता. राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले पुण्याचा महापौर झाल्या होत्या. शिवसेनेला उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. 

भाजपला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यावेळी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात हा पुणे पॅटर्न मोठा गाजला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पुणे पॅटर्न तोडण्यात आला होता. त्यानंतर पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आली. आघाडीने पाच वर्षे काम केले. २०१७च्या निवडणुकीत पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी केला; पण हे बंड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोडून काढले. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले.

अडीच वर्षांनंतर शिवसेनेचे ४० आमदार फुटले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे २९ आमदारांसह शिंदेसेना आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. पुणे महापालिकेत सध्या प्रशासक राज आहे. आता राज्यातही पुणे पॅटर्न झाला आहे. त्यामुळे पालिका निवडणूक भाजप स्वतंत्र लढविणार का?, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेऊन पुणे पॅटर्न म्हणून सामोरे जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.महाविकास आघाडी विरुद्ध पुणे पॅटर्न अशी निवडणूक होऊ शकते

शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि उद्धवसेना असे दोन गट पडले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे एक गट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर तर दुसरा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर जाणार आहे. काँग्रेस पक्ष उद्धवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या बरोबर आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गट या पुणे पॅटर्न विरुद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक 2024pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र