शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:15 IST

Ajit Pawar Meets Sharad Pawar in Govindbag: पुणे महानगरपालिकेत भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवत १२० जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत लढा दिला होता.

बारामती: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आज राज्याच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. निवडणुकीचे निकाल पूर्णपणे हाती येताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीतील त्यांच्या 'गोविंदबाग' या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी शप गटाचे खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे या आधीपासूनच गोविंदबागेत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

पुणे महानगरपालिकेत भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवत १२० जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत लढा दिला होता. या धक्कादायक निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये होणारी ही पहिलीच भेट आहे. ही भेट कौटुंबिक नसून यामागे काही मोठे राजकीय संकेत दडलेले आहेत, यावर सध्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली अजित पवार गोविंदबागेत पोहोचताच बारामतीसह संपूर्ण पुण्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील वाटचालीवर किंवा महापालिकेत मिळून विरोधी पक्ष म्हणून काम करण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार आणि शरद पवार पक्ष एकत्र येण्याची देखील शक्यता आहे. राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत. यामुळे भाजपला टक्कर द्यायची असेल, अस्तित्व टिकवायचे असेल तर दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Political Earthquake After Pune Result? Ajit Pawar Meets Sharad Pawar!

Web Summary : Following Pune's election results, Ajit Pawar met Sharad Pawar in Baramati, sparking political speculation. Discussions likely involve the future of both factions and potential collaboration against BJP in upcoming elections. Amol Kolhe and Supriya Sule were also present.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६