शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

सांस्कृतिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण : श्रीपाल सबनीस, मुक्तरंग पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 5:52 PM

राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.  मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देमुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळाराज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी बहारदार कविता सादर करून रसिकांची जिंकली मने

पुणे : जीवनातील प्रत्येक श्वासात कवितेचा ध्यास पेरणाऱ्या नव्या प्रतिभा आता पुण्या-मुंबई ऐवजी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून जन्माला येत आहेत. या नव्या अंकुरांना जुन्या जाणकरांनी तांब्या भरून पाणी घालावे आणि मराठी संस्कृतीचा मळा फुलवावा. तळातील नवे उन्मेषक सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करीत आहेत. राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. सोहळ्यात  सुशीलकुमार शिंदे (कवितासंग्रह : शहर आत्महत्या करायचं म्हणतंय), : ऐश्वर्य पाटेकर (कादंबरी; जू) शंकर विभूते, (कथासंग्रह : आडवाट) हे पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत.  दत्ता घोलप (समीक्षा), सुमित गुणवंत (कविता) यांना उदयोन्मुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य व  सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आकाश आप्पा सोनावणे आणि हृदयमानव अशोक यांचा विशेष  सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजाभाऊ भैलुमे,  प्रमोद आडकर, वि. दा. पिंगळे, राजेंद्र वाघ, शिरीष चिटणीस, म. भा. चव्हाण, महेंद्रकुमार गायकवाड, सर्वेश तरे, अंकुश आरेकर, डॉ. रामचंद्र काकडे, रवींद्र कांबळे, शुभम वाळूंज, दीप पारधे, बबन पोतदार, अजय बिरारी  हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.सबनीस म्हणाले, समाजात विविध प्रमाणात विधायक कर्तृत्वाचे डोंगर उभे करणारे साहित्यिक कलावंत विचारवंत हे समाजाचे मानदंड असतात. असे सांस्कृतिक नायक सन्मान पुरस्काराने सन्मानित करणे समाजाचे कर्तव्य असते. समाजाने संस्कृतीचे शुद्धीकरण केल्याशिवाय राजकीय आणि सामाजिक व्यवस्था सुधारणार नाही. उपेक्षित प्रवाहातून येणारे नवे साहित्यिक समाजाने स्वीकारले आणि गौरविणे सर्वार्थाने आवश्यक आहे.या समारंभासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी भीमराव कोते यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या बहारदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कविसंमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द गझलकार दत्तप्रसाद जोग यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे आणि जित्या जाली यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब घोंगडे यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष सागर काकडे यांनी मानले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणे