शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

PDCC च्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलचं पेटणार; अजितदादा नेमकी कोणाला संधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 22:03 IST

मंत्री, आमदारांना सुटेना जिल्हा बँकेचा मोह; जिल्हा बँकेचे कारभारी होण्यासाठी जोरदार फिल्डींग

ठळक मुद्देजिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच केंद्रबिंदू

पुणे: पुणे जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांना महत्त्वाचे मंत्री पद असताना देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा मोह सुटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याचे राजकारण आणि ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ हाताशी हवेच यासाठी मंत्री, आमदारांनी पडद्याआडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.  तर काही सदस्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच पेटणार आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच केंद्रबिंदू ठरली आहे. यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व गेले अनेक वर्षे टिकून ठेवले आहे. यामुळेच राज्यात अनेक महत्त्वाचे मंत्रीपद भूषवली तरी बँकेचे संचालकपद कायम ठेवले.

पवारानंतर  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणेहे देखील बँकेवर संचालक आहेत. याचबरोबर खेडचे आमदार दिलीप मोहिते, पुरंदर आमदार संजय जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे, आमदार अनिल भोसले हे आमदार बँकेवर संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. याचबरोबर या निवडणुकीमध्ये आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांनी देखील संचालक म्हणून निवडून जाण्याचा चंग बांधला आहे. अजित पवार यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या बँकेवर संचालक म्हणून निवडून देण्यासाठी अजित पवारांचे निकटवर्तीय असणे अतिशय महत्त्वाचे असते. तरच बँकेवर जाता येते.

जिल्हा बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. या बँकेचे  कारभारीपद मिळण्यासाठी सर्वच धडपड सुरू असते. परंतु गेले अनेक वर्षे बहुतेकांच्या नशिबी वनवास आला आहे. यामुळेच यंदा होणा-या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून बसले आहेत.  जिल्हा बँक निवडणुकीसाठी सध्या अनेक नावांची चर्चा होत असली तरी अजित पवार नेमकी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारbankबँकElectionनिवडणूक