वाघोलीत २२३८१ बालकांना दिला पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:44+5:302021-02-05T05:20:44+5:30
पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव, केसनंद ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड मॅडम यांनी मोहिमेत ...

वाघोलीत २२३८१ बालकांना दिला पोलिओ डोस
पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव, केसनंद ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड मॅडम यांनी मोहिमेत अंतर्गत एकूण चार उपकेंद्र वाघोली, लोहगाव, मांजरी खुर्द, केसनंद येथील एकूण २२३८१ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला आहे. यामध्ये एकूण ७८ बुथ मोबाईल टीम २ या मध्ये एकूण मनुष्य बळ २३४ कर्मचारी तसेच १६ पर्यवेक्षक, २ वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत.
मंगळवारपासून प्रत्येक घरोघर जाऊन बालकांना पोलिओ पाजण्यात येणार असून इतर ८ गावामध्ये ही मोहीम राबवुन वीटभट्टी, ऊसतोड, बांधकाम, फिरस्ती, झोपडपट्टी भागात मोहीम राबविणार आहे.
वाघोली ४३, लोहगाव १५, वडगाव शिंदे ३, निर्गुडी १, केसनंद ५, कोलवडी ४, मांजरी खुर्द २, आव्हाळवाडी ५ अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे यांनी दिली.
फोटो ओळ : बालकांना पल्स पोलिओ डोस देताना जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके आणि वैद्यकीय अधिकारी.