Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता आमदार खडसे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
"डॉ. प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. या माझ्या दाव्याला आता पुष्टी मिळाली आहे. माझी पत्रकार परिषद सुरू असताना प्लेन ड्रेसमध्ये माझ्या घरासमोर आठ ते दहा पोलिस होते. काहीजण पत्रकारांमध्ये येऊन बसले होते. पोलिसांना घरामध्ये येऊन बसण्याची कोणी अधिकार दिला. मला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार आहे. या राज्यात काय सुरू आहे? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
"सरकार कोणत्या कारणासाठी घाबरत आहे. या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे, असंही खडसे म्हणाले. यावेळी एकनाथ खडसे यांनी काही व्हिडीओ दाखवले. यामध्ये सीव्हील ड्रेसमध्ये काहींच्या संशयास्पद हालचाली दिसत आहेत. यावेळी खडसे म्हणाले, आम्ही त्या पोलिसांना विचारले तर ते म्हणाले की आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी आलो आहे.
"सरकारने माझ्यावर पाळत ठेवण्याचे कारण काय? सरकार का घाबरत आहे. ती रेव्ह पार्टी नव्हती. ठरवून अडकण्याचा केलेला प्रयत्न आहे. असा आरोप खडसे यांनी केला.
रेव्ह पार्टी कशी?
या पार्टीमध्ये संगीत नाही, गोंधळ नाही, मग ही रेव्ह पार्टी कशी म्हणता. पोलिसांना विचारणे आहे की रेव्ह पार्टी म्हणजे काय?
पोलिसांनी जी कारवाई केली त्याचे व्हिडीओ मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. पोलिसांना कुठले अधिकार आहेत? पोलिसांना चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही, यातून बदनामी केली आहे.
प्रांजल खेवलकर यांच्यावर एक ही गुन्हा नाही, त्यांना एक नंबरचा आरोपी का केला?, असा सवाल खडसेंनी केला.
एका महिलेच्या बॅग मधून अमली पदार्थ सापडले मग तिला का नाही केले पहिल्या नंबर चे आरोपी? पहिल्या क्रमांकाचा आरोपी तिला करून या लोकांना साक्षीदार करायला होतं, असंही खडसे म्हणाले.