शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळी ज्येष्ठ महिलांना प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देत लुटणाऱ्या 'पिंकी'ला पोलिसांच्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 21:45 IST

विविध राज्यातील धार्मिक स्थळावर पिंकीने चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर

पुणे : धार्मिक स्थळावर आलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलांना प्रसादातील पेढ्यात गुंगीचे औषध खायला देऊन लुटणाऱ्या पिंकी परियाल या महिलेला फरासखाना पोलिसांनी अटक केली. ती मुळची झारखंडच्या जमजेशदपूरची रहिवासी असल्याचे कळते. तिच्याकडून गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवार पेठेतील एका ७२ वर्षाच्या महिलेला २५ जून रोजी बुधवार पेठेतील मोबाईल मार्केटमध्ये पिंकी भेटली. तिने या महिलेला दरमहा २ हजार रुपये मिळवून देते, असे सांगून रिक्षातून स्वारगेटला नेले. तेथे तिने गुंगीचे औषध मिसळलेला प्रसाद खाण्यास दिला. या महिलेला गुंगी आल्यावर तिच्याकडील रोकड व अडीच तोळ्याचे दागिने चोरुन नेले होते.या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अभिनय चौधरी व सयाजी चव्हाण यांना ही संशयित महिलापुणे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये जाताना दिसली. लॉजच्या रजिस्टरची पाहणी केली असता तिचे नाव पिंकी परीयाल असल्याचे समजले. पोलिसांनी तिच्यावर नजर ठेवली होती. चोरीसाठी पिंकी परत स्टेशन परिसरातील लॉजवर येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या सुचनेनुसार, सहायक पोलिस निरीक्षक मनोज अभंग याच्या पथकाने सापळा रचून पिंकीला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून तिची सखोल चौकशी केली असता तिने विविध ठिकाणी अशा चोऱ्या केल्याचे सांगितले.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक तटकरे, कर्मचारी रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, आकाश वाल्मिकी, अमोर सरडे यांच्या पथकाने केली. 

अनेक ठिकाणी केल्या चोऱ्या

पिंकी परियालने शिर्डी परिसरात देखील महिलांचे दागिने चोरले होते. वेगवेगळ्या राज्यातील धार्मिक स्थळावर तिने अशाच प्रकारे चोरी केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. धार्मिक स्थळी येणाऱ्या जेष्ठ महिलांना ती अगोदर हेरायची. त्यानंतर प्रसादाच्या पेढ्यातून झोपेच्या गोळ्याची पावडर मिसळून खाऊ घालत असे. एकदा का महिला बेशुद्ध झाली की तिच्या अंगावरील दागिने व ऐवज चोरी करून ती पळ काढायची अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला