शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन जिमखान्यावर पोलिसांनी पकडला ९ किलो गांजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 21:37 IST

डेक्कन जिमखाना परिसरातील खिलारेवाडी येथे अमली पदार्थाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला मिळाली़.

ठळक मुद्देअधिक तपासासाठी २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर

पुणे :  डेक्कन जिमखाना परिसरातील खिलारेवाडी येथे गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले़. त्यांच्याकडून तब्बल ९ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे़. संजय बाटुंगे (वय ४५), सुरेश पंडित (वय २०, दोघे रा़ खिलारेवाडी) आणि राजू सोनवणे (वय २९, रा़ खडकवासला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.   पोलिसांनी सांगितले की, खिलारेवाडी येथे अमली पदार्थाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला मिळाली़. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी खिलारेवाडी येथे सापळा रचून दोघांना पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत राजू सोनवणे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले़. त्यानुसार तिघांना अटक करुन त्यांच्याकडून ९ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे़.त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी गांजा कोठून आणला, यापूर्वी त्यांनी कोणाला त्याची विक्री केली आहे, याचा तपास करायचा असून त्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती करण्यात आली़. न्यायालयाने ती मान्य कन तिघांना अधिक तपासासाठी २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक