शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खडकवासला येथे सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:52 IST

आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द यापूर्वी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल

खडकवासला:  येथील सिंहगड रस्त्यावर चौकात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एका सराईताकडून  कारसह गावठी पिस्तूल  व जिवंत काडतुस जप्त करून त्याला अटक केली आहे.ही कारवाई मंगळवारी ( २७ जानेवारी) सायंकाळी गुन्हे शाखेचे पथक सिंहगड रोड परिसरात रेकॉर्डवरील फरारी आरोपीचा शोध घेत असताना येथील दत्तात्रय शिवाजी मते हा दहशतीसाठी त्याचेजवळ गावठी पिस्तूल बाळगून कारने (एमएच-१२ ईएक्स ६१७४)  एनडीए रोडने सिंहगड बाजूकडे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथकाने साध्या वेशात खडकवासला धरण चौकात सापळा रचून दत्तात्रय शिवाजी मते (वय ४५ वर्षे) रा.खडकवासला, ता.हवेली यास अटक करून विनापरवाना गावठी पिस्तूल  व १ जिवंत काडतुस असा कारसह रुपये (दोन लाख चारशे) रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द यापूर्वी हवेली व उत्तमनगर या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील फरारी आरोपी यांना पकडण्याच्या कामी विशेष मोहिम राबवण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या यांनी आदेश दिलेले होते.  त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक  पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, दयानंद लिमन, रवि शिनगारे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, ज्ञानदेव क्षीरसागर, दत्ता तांबे, अक्षय जावळे यांचा या पथकात समावेश होता .   आरोपीने पिस्तुल व काडतुस कोठून आणले? कोणत्या कारणासाठी ते जवळ बाळगले? याबाबतचा अधिक तपास हवेली पोलीस स्टेशन करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस