शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी सूतावरुन गाठला स्वर्ग ; तब्बल ७ दिवस मुंबईत राबविली शोध मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 12:48 IST

वारजे माळवाडी येथील एक १५ वर्षाचा मुलगा सकाळी शाळेत जातो, म्हणून गेला तो परत आलाच नाही़ त्याच्याकडील मोबाईलही बंद होता़.

पुणे : वारजे माळवाडी येथील एक १५ वर्षाचा मुलगा सकाळी शाळेत जातो, म्हणून गेला तो परत आलाच नाही़. त्याच्याकडील मोबाईलही बंद होता़. कोणताही धागा दोरा नव्हता़ अशातून तो मुंबईला असल्याचा एक धागा पोलिसांच्या हाती लागला़. त्या एका धाग्यावरुन मुंबईच्या गर्दीत तब्बल सात दिवस तपास करुन मुलाचा शोध लावण्याची कामगिरी वारजे पोलिसांनी केली़. या मुलाचे वडिल माळी काम करतात, तर आई गृहिणी आहे़ हा १५ वर्षाचा मुलगा २० एप्रिलला सकाळी साडेसात वाजता शाळेत जातो, म्हणून गेला तो परत आला नाही़. अल्पवयीन असल्याने वारजे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला़. मुलाकडे असलेला मोबाईलही बंद असल्याचे आढळून आले़. त्यामुळे एवढ्या दुनियेत त्याला शोधायचे कोठे असा प्रश्न पोलिसांना पडला़. त्यात त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर तो मुंबईत असल्याचे आढळून आले़. त्याच्या मोबाईलवर मुंबईतील एका नंबर वरुन मेसेज आले होते़ हा इतकाच धागा होता़. आता त्यावरुन मुंबई सारख्या अफाट गर्दीच्या शहरात त्याचा शोध घेणे म्हणजे गवतातून सुई शोधण्यासारखेच होते़. ज्या नंबरवरुन त्याच्या मोबाईलवर मेसेज गेले होते़. त्या टॅक्सीचालकाचा पोलिसांनी शोध लावला़. त्याला मुलाचा फोटो दाखविल्यावर त्याने तो ओळखला व माझ्या मोबाईलवरुन त्याने त्याच्या हरविलेल्या मोबाईलवर मेसेज पाठविला होता़. मी त्याला एक दिवस घरी राहायला दिले़. दुसऱ्या दिवशी तो निघून गेला इतकीच माहिती पोलिसांना मिळाली़. त्यातून तो मुंबईत असल्याची खात्री पडली़. त्यानंतर पोलिसांनी आग्रीपाडा, भायखळा, डोंगरी मश्जिद बंदर अशा ठिकाणी त्याचा प्रत्यक्ष लोकांना भेटून, फोटो दाखवून शोध सुरु केला़. तेव्हा मश्जिद बंदर येथे एका ठिकाणी तो शनिवारी सापडला़. पुण्याला आणून त्यांनी त्याला आई वडिलांच्या स्वाधीन केले.  मौजमजेसाठी आपण मुंबईला गेल्याचे तर आईवडिलांच्या भांडणामुळे मुंबईला गेल्याचे अशी वेगवेगळी कारणे तो सांगता़े़. कारण काहीही असले तरी सूतावरुन स्वर्ग गाठल्याचा पोलिसांना आनंद झाला़. सलग चार दिवस अखंड कष्ट घेऊन ही कामगिरी वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, सहायक निरीक्षक लक्ष्मण उकिर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन बोधे, पोलीस नाईक धनंजय ताजणे, अमोल काटकर व चंद्रकांत जाधव यांनी केली़.ले  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिस