ओतूर पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्यांंवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:11 IST2021-03-25T04:11:16+5:302021-03-25T04:11:16+5:30

विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करून अशा फिरस्त्यांना चपराक दिली जात असल्याचे ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम ...

Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | ओतूर पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्यांंवर धडक

ओतूर पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्यांंवर धडक

विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करून अशा फिरस्त्यांना चपराक दिली जात असल्याचे ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची नितांत गरज भासत आहे मात्र अजूनही काही ठिकाणी जनता गांभीर्याने घेत नसल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांकडून सदर कारवाई होत आहे. या कारवाईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बनकर, अंकुश काळे, योगेश पाटेकर, आनंत, अमोल मडके, होमगार्ड गवारी यांचा समावेश होता.

विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटी समजून सांगून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात या विषयी पोलिसांकडून नागरिकांना माहिती दिली जात आहे. पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील पोलीस अधिकारी परशुराम कांबळे यांनी केले आहे.

--

Web Title: Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck