शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

राष्ट्रवादीच्या 'माहेर' घरी भाजप कार्यालयाला पोलिसांचे 'सुरक्षा कवच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 16:55 IST

शहरात काही दिवसांपूर्वीच पवारसाहेबांच्या आमराई येथील बंगल्याजवळ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे शरद पवार यांच्यावरील कारवाईनंतर बारामतीत पोलिसांची दक्षता 

बारामती :राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामतीकर संतप्त झाले आहेत. बुधवारी(दि २५) सकाळी हजारो बारामतीकरांनी शहरात एकत्र येत त्यांच्या संतापाला वाट मोकळी केली.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या माहेर घर मानले जाणाऱ्या शहरात नुकत्याच सुरु झालेल्या भाजपच्या संपर्क कार्यालयाला सुरक्षेसाठी पोलीस आणि आरसीपी जवानांचा गराडा पडला आहे. बुधवारी सकाळपासुनच कार्यालयाला २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक,पाच पोलीस कर्मचारी,आरसीपी पथकाच्या १५ जवानांसह एकुण २० जणांचा कार्यालयाला बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे. बुधवारी(दि २५) बारामतीकरांनी कडकडीत बंद पाळत शासनाचा निषेध केला.ज्येष्ठ नेते पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावरील कारवाई बारामतीकरांच्या जिव्हारी लागली आहे. कारवाईचे तीव्र पडसाद बारामतीमध्ये उमटल्यानंतर दक्षतेच्या पार्श्वभुमीवर भाजप कार्यालयाच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्यात आली आहे.शहरात काही दिवसांपूर्वी पवारसाहेबांच्या आमराई येथील बंगल्याच्या जवळच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.बारामतीकरांच्या शासकीय कामातील अडचणी सोडविण्यासह येथील मतदारांशी संपर्क सातत्य वाढविण्यासाठी कार्यालय उघडण्यात आले आहे.ईडी कारवाईनंतर काल रात्रीपासूनच शहरात तणावाचे वातावरणात आहे.

भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी जवळच असणाऱ्या भाजपच्या पक्ष कार्यालयाला कार्यकर्ते,नागरीक यांच्या संतापाची झळ बसु नये,याची पोलीस प्रशासनाने दक्षता घेतल्याचे पाहावयास मिळाले. बुधवारी शहरात दिवसभर  राष्ट्रवादीच्या 'माहेर' घरी भाजप कार्यालयाला पोलिसांचा पडलेला गराडा चर्चेचा विषय ठरला. कोणतीही अघटित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय करण्याच्या हेतुने  हा पोलीस बंदोबस्त लावला आहे. शहरात आज कडकडीत बंद  पाळल्यानंतर भाजप कार्यालयात देखील आज शुकशुकाट पाहावयास मिळाला.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारBJPभाजपाAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूकPoliceपोलिस