शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तत्परतेने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे वाचविले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 19:02 IST

लॉकडाऊनमध्ये देणेकरांशी खोटे बोलता येत नसल्याने झाला होता निराश

ठळक मुद्देकोरोनामुळे व्यवसाय झाला बंद, काही व्यवहार अडकले असून त्यामुळे झाले कर्ज

पुणे : शहरात आत्महत्येचे सत्र सुरु असता असताना पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेने आणखी एक आत्महत्येचा प्रकार टळला. आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी वाचविले. जुन्या वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारा हा तरुण लॉकडाऊनमुळे कर्जात बुडाला होता. पैसे देणार्‍यांचे दररोज फोन येत होते. पण त्यांना तो खोटी आश्वासने देऊ शकत नव्हता. त्यामुळे तो आत्महत्या करायला चालला होता.पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्याने मार्केटयार्ड येथील हाईड पार्क येथे राहणारा त्याचा मित्र आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. या माहितीवरुन मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील बीट मार्शल  मकसुद तांबोळी आणि उत्तम शिंदे यांनी तातडीने त्याचे घर शोधून काढले व फ्लॅटचा दरवाजा वाजवून उघडण्याची विनंती केली. त्यावेळी आतील तरुणाने सुरुवातीला दरवाजा उघडण्यास नकार दिला. साहेब तुम्ही कृपा करुन निघून जावा, मी आज खूप टेंशनमध्ये असून मला आज आत्महत्या करायची आहे, असे मी मित्रांनाही फोनद्वारे कळविले आहे. पोलिसांनी त्याला विनवणी करत समजावून सांगितले. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक खटके, उपनिरीक्षक भोसले यांनी त्याला समजावून सांगितले. त्याच्या भावाला बोलावून घेतले.कोरोनामुळे व्यवसाय बंद झाला आहे. काही व्यवहार अडकले असून त्यामुळे कर्ज झाले आहे. पैसे देणे असल्याने दररोज फोन येत होते. देणेकऱ्यांना खोटे बोलता येत नव्हते. गेले दोन ते तीन दिवस घरात एकटाच होतो. आत्महत्या केल्यानंतर बाकीची काहीही कटकट राहणार नाही, असे वाटल्यामुळे आत्महत्येचा पर्याय निवडला.पोलिसांनी त्याला समजावून सांगितले. ज्यांचे पैसे तो देणे होता, त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. तसेच त्यांना पैशासाठी फोन न करण्यास सांगितले़ व व्यवसाय पुन्हा जोमाने सुरु करुन पैसे देण्यास सांगितले. पोलिसांच्या सहकार्यामुळे या तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व त्याने पुन्हा नव्याने व्यवसाय जोमात सुरु करण्याचे पोलिसांना आश्वासन दिले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस