शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसही आॅनलाईन

By admin | Updated: June 26, 2015 04:19 IST

: पुणे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणी आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील १० पोलीस ठाणी ‘गो-लाईव्ह’ प्रणाली

जेजुरी : पुणे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणी आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील १० पोलीस ठाणी ‘गो-लाईव्ह’ प्रणाली अंतर्गत आॅनलाईन करण्यात आली आहेत. आजपासून ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे संगणकीकृत करुन ती सतत पोलीस अधिक्षक कार्यालयासह एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पोलीस खात्याकडून ‘गो-लाईव्ह’ ही संगणक प्रणाली विकसीत केली आहे. ही प्रणाली योग्य रीतीने चालावी म्हणून प्रथम प्रायोगिक तत्त्वावर जेजुरी, वडगाव निंबाळकर, बारामती शहर, वेल्हे, घोडेगाव, शिरूर, मंचर, लोणावळा शहर, आळंदी व दौंड या दहा पोलीस ठाण्यांत आजपासून सुरू करण्यात आली आहे.यामुळे प्रत्येक पोलीस ठाणे पोलीस अधिक्षक कार्यालयासह एकमेकांशी आॅनलाईन जोडली जाणार आहेत. याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यातील घटना, गुन्ह्याची माहिती, अपघातांची माहिती, आरोपींची माहिती, बंदोबस्ताची सर्वच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. साधी एन. सी. अथवा फिर्याद रजिस्टर्ड झाली की ती गो-लाईव्ह प्रणालीतून जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात पोहोचणार आहे. गुन्ह्याच्या तपास कामात मोठे सहकार्य मिळणार आहे. शिवाय दाखलेही त्वरीत उपलब्ध होणार आहेत. (वार्ताहर)