शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपायुक्त महिलेचा भलताच दावा: 'माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 17:42 IST

पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी केली होती बिर्याणीची मागणी

ठळक मुद्देऑडिओ प्रसारित झाल्यानंतर गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेशउपायुक्तांकडून ऑडिओतून छेडछाड केल्याचा दावा

पुणे : संभाषणाची ऑडिओ खोडसाळपणे व्हायरल केला असून,  त्यात काही तांत्रिक बदल किंवा छेडछाड करण्यात आल्याचा दावा पोलीस उपायुक्त नारनवरे यांनी केला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी हप्तेखोरी करत होता. त्याच्यावर कारवाई केल्याने गैरप्रकारांना आळा बसला होता. माझ्यावर रोष होता. माझी बदली व्हावी तसेच माझ्यावर कारवाई होऊन मी अडचणीत यावे, या हेतूने व्हायरल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी कर्मचा-याला एका उपाहारगृहातून पोलीस कर्मचा-याला पैसे न देता बिर्याणी आणण्याचे आदेश दिले.  तेव्हा बिर्याणी घेतल्यानंतर आपल्याच ह्ददीतले हॉटेल आहे ना? मग त्याचालकाला पैसे कशाला द्यायचे, अशी विचारणा केली. या संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाचा ऑडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर पोलीस दलासह समाजात खळबळ उडाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी दिले प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

या फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली असून, प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नारनवरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगितले. .तेव्हा या कर्मचाऱ्याने मॅडम साजूक तुपातील बियार्णी आणू का ?, असे त्यांना विचारले. फार स्पायसी नको....जरा तोंडाला टेस्ट पण आली पाहिजे. त्यामुळे प्रॉंन्स पण आण..  बियार्णीचे पैसे कसे देणार असे नारनवरे यांनी विचारले असता त्याने बिर्याणी घेतल्यानंतर हॉटेलमध्ये पैसे देतो, असे सांगितले.

तेव्हा हद्दीतील त्या चालकाला पैसे कशाला द्याायचे, अशी विचारणा नारनवरे यांनी केली. संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित झाली.  मात्र, नारनवरे यांनी ध्वनीफितीमध्ये तांत्रिक छेडछाड केली असल्याचा दावा केला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणाची पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे आदेश दिले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलWomenमहिला