शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सराफा दुकानात गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याला पोलीस अंमलदाराने धाडसाने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:54 IST

'मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले...'

पुणे : कोंढव्यातील सराफा दुकानात शिरुन गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याच्या हातात पिस्तुल असतानाही एका पोलीस अंमलदाराने  धाडसाने झडप घालून त्याला पकडले. पोलीस अंमलदार अंकुश केंगले असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गोळीबार करणार्‍या सौद असिफ सय्यद (रा. फैजाना मस्जिदजवळ, मिठानगर, कोंढवा) याला अटक केली आहे. ही घटना कोंढव्यातील आंबेडकर नगरमधील अरिहंत ज्वेलर्समध्ये गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडला.

गेल्या बुधवारी पहाटे आणि रात्री अशा लागोपाठ दोन दिवस उशिरापर्यंत सुरु असलेल्या मेडिकलच्या दुकानात शिरुन पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याअनुशंगाने गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी परिसरातील सर्व मेडिकल दुकानदारांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. तसेच गस्त घालण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी मुकेश ताराचंद गुगलिया (वय ५०, रा. सनफ्लॉवर सोसायटी, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलिया यांचे कोंढव्यातील आंबेडकरनगर येथे अरिहंत ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते व त्यांचा कामगार शुभम हे दुकानात बसले होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास असताना दुचाकीवरुन सौद सय्यद व रुहान खान हे दोघे आले. त्यांनी दुकानदाराला बाहेर पडता येऊ नये, म्हणून दुकानाचे शटर बंद केले आणि गुगलिया यांच्याकडे पैसे व सोने काढून देण्याची मागणी करु लागले. गुगलिया यांनी ते न दिल्याने त्याने त्याच्याकडील पिस्तुलामधून एक गोळी झाडली. या गोळीचा आवाज ऐकून दुकानाबाहेर गर्दी जमली. तेव्हा दोघेही चोरटे आरडाओरडा करीत व पिस्तुलाचा धाक दाखवून पळून जाऊ लागले. त्याचे वेळी पोलीस अंमलदार अंकुश केंगले हे गस्त घालत तेथे येत होते. दुकानापासून सुमारे १०० मीटर अंतरावर चोरटे पळून चालले होते. अंकुश केंगले यांच्यासमोर सौध हा पिस्तुल घेऊन येत होता. तरीही न डगमगता त्यांनी झडप घालून त्याला पकडले. या गडबडीत त्याच्या साथीदार पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर व अन्य पोलीस अधिकार्‍यांनी  घटनास्थळी धाव घेतली. अंकुश केंगले यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

याबाबत अंकुश केंगले यांनी सांगितले की, मी गस्त घालत जात असताना समोरुन आरडाओरडा करत दोन तीन मुले धावत येत असल्याचे दिसले. त्याचवेळी एकाच्या हातात पिस्तुल दिसले. पण मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्याच्या हातातील पिस्तुल काढून घेतले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड