...त्या पोलिसांची चौकशी सुरू

By Admin | Updated: September 3, 2015 03:15 IST2015-09-03T03:15:53+5:302015-09-03T03:15:53+5:30

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असताना दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या पोलिसांना मात्र कोणीच हटकले नाही. ही वस्तुस्थिती विशद करणारे

... that police inquiry started | ...त्या पोलिसांची चौकशी सुरू

...त्या पोलिसांची चौकशी सुरू

पिंपरी : बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असताना दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या पोलिसांना मात्र कोणीच हटकले नाही. ही वस्तुस्थिती विशद करणारे वृत्त बोलक्या छायाचित्रासह लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले. कारवाईची मोहीम सुरू असताना हटकले नाही. लोकमतमध्ये छायाचित्र आल्यानंतरही कारवाईत दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या पोलिसांविरुद्धच्या कारवाईचे पाऊल उचलले गेले. ज्या दुचाकीवर पोलीस ट्रिपल सीट होते, त्या दुचाकीची नोंदणी अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील असल्याने अहमदनगरला पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पिंपरी विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, ‘‘वाहन क्रमांकाच्या आधारे त्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास वाव मिळाला आहे. दुचाकीवरील एका पोलिसाचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. पोलिसांचा चेहरा ओळखू येईल, असे स्पष्ट छायाचित्र नसल्याने ते पोलीस कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, याची माहिती मिळविण्यात अडचणी येत आहेत. ज्या व्यक्तीच्या नावे अहमदनगरला दुचाकीची नोंदणी झाली आहे, त्याच्याकडून त्या पोलिसांचे नाव समजू शकेल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होईल. शंभर टक्के कारवाई करायची आहे.’’
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एमएच १६ एक्यू ४६९५ या दुचाकीवरून चक्क पोलीसच ट्रिपल सीट जात असल्याचे छायाचित्र ‘लोकमत’ने टिपले. दुचाकीस्वारासह मध्ये एक आणि शेवटी गणवेशातील पोलीस कर्मचारी असे तीन जण वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर निघून गेले. त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतरही कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणाच्या आधारे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी वाहनचालकांना घरपोच नोटीस पाठविणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता. यानंतर बेशिस्त पोलिसांच्या चौकशीला वेग आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ... that police inquiry started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.