शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

प्राध्यापकांचा पगार थकविल्याने ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’विरोधात पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:43 IST

सोळा महिन्यांपासून रखडलेले वेतन त्वरित मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्यामुळे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देचिघळलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानसोसायटीच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आॅक्टोबर २०१६ पासून वेतन रखडले

खडकवासला (पुणे) : सोळा महिन्यांपासून रखडलेले वेतन त्वरित मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्यामुळे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तथापि चिघळलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आॅक्टोबर २०१६ पासून वेतन रखडले आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाकडे प्राध्यापकांनी वेळोवेळी मागणी केली; परंतु आर्थिक अडचणीचे कारण देत संस्थेने चौदा महिने थांबवले. संस्थेच्या प्राध्यापकांनी आंदोलनाचा इशारा देण्यात येऊनही संस्थेच्या व्यवस्थापनाने टाळाटाळ केल्याने १८ डिसेंबर २०१७ पासून प्राध्यापकांनी असहकार आंदोलन सुरू केले होते. त्यावर संस्थेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी आणि प्राध्यापकांमध्ये झालेल्या बैठकीत २४ जानेवारीपासून  रखडले  वेतन टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरवण्यात आले होते. या बैठकीस संस्थेच्या व्यवस्थापनातर्फे जी. के. सहानी, डॉ. ए. व्ही.  देशपांडे, डॉ. एस. डी. लोखंडे, डॉ. पी. सी. काळकर, डॉ. व्ही.  व्ही. दीक्षित आणि डॉ.  एम. एस. गायकवाड सहभागी झाले होते. प्राध्यापकांना हा तोडगा मान्य  होता. त्यामुळे ८ जानेवारीपासून आंदोलन थांबविले होते. मात्र, सोसायटीने वेतन दिले नाही, त्यामुळे २५ जानेवारीपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान  प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी एआयसीटीई, तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दाद  मागितली आहे. मात्र कोणीच दखल घेतली नाही. या कालावधीत एसआयसीटीईने प्राध्यापकांच्या वेतनासाठी नोटीस बजावली. त्याला सोसायटीच्या व्यवस्थापनाने योग्य प्रतिसाद न दिल्याने एसआयसीटीईच्या समितीने २२  महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली. या निर्णयाच्या विरोधात सोसायटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होईल.

टॅग्स :sinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युटPuneपुणेHigh Courtउच्च न्यायालय