शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या ‘सविनय कायदेभंगा’ला पोलिसांचे दंडाने प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 17:01 IST

समितीच्या अध्यक्षांसह अनेकांना काही वेळातच हेल्मेट न घातल्याबद्दल ५०० रुपये दंड भरण्याचे एसएमएस आले.

ठळक मुद्देपोलिसांनीही हेल्मेटबाबत कायद्याची अंमलबजावणी करण्यावर पोलिस ठाम असल्याचे स्पष्टन्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई

पुणे : हेल्मेटसक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट न घालता रस्त्यावर उतरून ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन करणाऱ्या हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीला पोलिसांनी दंडाने प्रत्युत्तर दिले आहे. समितीच्या अध्यक्षांसह अनेकांना काही वेळातच हेल्मेट न घातल्याबद्दल ५०० रुपये दंड भरण्याचे एसएमएस आले. पण हा दंड न भरण्याची भुमिका समितीने घेतली आहे. तर पोलिसांनीही हेल्मेटबाबत कायद्याची अंमलबजावणी करण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.नवी पेठेतील पत्रकार भवन येथून सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची दुचाकी फेरी सुरू झाली. यावेळी वाहतुक पोलिसांचा फौजफाटाही हजर होता. याठिकाणी वाहतुक पोलिसांनी फेरीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकींची जागेवरच छायाचित्र घेतली. त्यामुळे तिथेच पोलिसांची भुमिका स्पष्ट झाली होती. सुमारे ५० ते ६० दुचाकी याठिकाणी होत्या. पोलिसांनी बहुतेकांची छायाचित्रे काढून लगेचच डिजिटल पावत्या करण्यास सुरूवात केली. तिथून ही फेरी पुढे गेल्यानंतर चौकांचौकांमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्येही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची छायाचित्रे घेण्यात आली. ही फेरी पोलिस आयुक्तालयाजवळ पोहचेपर्यंत काही जणांना ५०० रुपये दंडाचे ‘एसएमएस’ही आले होते. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाठक यांनाही दंडाचा ‘एसएमएस’ आला आहे. हा दंड न भरण्याची भुमिका त्यांनी घेतली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, पत्रकार भवनजवळ आलेल्या वाहतुक पोलिसांनीही हेल्मेट घातले नव्हते. त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. हे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिस आयुक्तांनीही केवळ स्मितहास्य केले. माझ्यासह अनेकांना दंडाचे ‘एसएमएस’ आले आहेत. पण हेल्मेटसक्तीला आमचा विरोध आहे. त्यामुळे हा दंडही भरणार नाही. समितीतील अनेकांची हीच भुमिका आहे. याबाबत लवकरच समितीच्या बैठकीत पुढील दिशा ठरविली जाईल. ------------न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे. फेरीतील सहभागींवरही त्यानुसार कारवाई केली जाईल. चौकांमधील सीसीटीव्हीमध्ये आलेल्या हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार आहे.- तेजस्वी सातपुतेपोलीस उपायुक्त, वाहतुक शाखा---------

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस