शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नसल्याने पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 12:00 IST

शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटंंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला.

पुणे - शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटंंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले आहे़ काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला होता़ टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़.  खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत़ शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासून अपुरा पाणीपुरवठा होत होता़ त्यात गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी टाकीतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये तर अत्यंत कमी दाबाने गेल्या ४ दिवसांपासून पाणी येत आहे़ अनेक इमारतीमध्ये तर पाणीच आले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कुटुंब रविवारी सकाळी रस्त्यावर आले़ महिलांनी पुढाकार घेऊन वसाहतीबाहेरील रस्त्यावर बादल्या, हंड्यांसह ठाण मांडले आहे़. दुसरीकडे काही महिला व पुरुष यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला़ त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ त्यानंतर गिरीश बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरविले जाईल असे आश्वासन दिले़ त्यानंतर महिला व इतर नागरिक घरी गेले. शिवाजीनगर पोलीस लाईनला आज सकाळी अडीच तास पाणी पुरवठा केला होता़ पण, तो कमी दाबाने झाल्याने अनेक ठिकाणी पाणी पोहचले नाही़ त्यामुळे आता तेथे ३ टँकर पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसFamilyपरिवारgirish bapatगिरीष बापट