शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 14:02 IST

अटक केल्यानंतर आरोपीला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे अनिवार्य असल्याचे कारण देत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली.

ठळक मुद्देपहाटेच केले न्यायालयात हजर, इतर आरोपींना दुपारपर्यत हजर करण्याची शक्यता जिल्हा न्यायालयात पहाटे ५ ते ७ दरम्यान सुनावणीकोरेगाव भीमाबाबत देखील काही पुरावे

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या नागपूरमधील इंडियन असोसिएशन आॅफ पीपल्स लॉयर्सचे सरचिटणीस अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहे. अटक केल्यानंतर आरोपीला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे अनिवार्य असल्याचे कारण देत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात पहाटे ५ ते ७ दरम्यान सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला पहाटे हजर करण्यात आली असल्याची शक्यता आहे. तसेच इतर आरोपींना गुरुवारी दुपार पर्यत न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.  शनिवारवाडा येथे कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरने ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित एल्गार परिषदेत करण्यात आलेली चिथावणीखोर भाषणे व गाण्यांमुळे भीमा-कोरेगाव दंगल भडकल्याचा आरोप आहे. या आयोजनामागे माओवाद्यांचा काही संबंध आहे का याची चाचपणी पुणे पोलीस करण्यात येत आहे. त्याचं अनुषंगाने विद्रोही मासिकाचे संपादक सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठातल्या प्राध्यापिका शोमा सेन, कमिटी फॉर द रिलीज आॅफ पॉलिटिकल्सचे जनसंपर्क सचिव रोना विल्सन आणि भारत जनआंदोलन संघटनेचे कार्यकर्ते महेश राऊत यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड उज्वला पवार यांनी युक्तिवाद केला की, अटक आरोपी हा सीपीआय या माओवादी संघटनेचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला असता त्यांच्याकडून ८१कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्या कागदपत्रांत महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा यंत्रणेबाबतचे नकाशे मिळाले आहे. हे नकाशे सीपीआयला पुरविण्यात आले असल्याची शक्यता आहे.तसेच कोरेगाव भीमाबाबत देखील काही पुरावे मिळाले आहेत. त्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये एकूण १६ मुद्दे आहेत. त्या आधारे आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. पवार यांनी केली होती. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. मालवीय यांनी युक्तिवाद केला.

 

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगावCourtन्यायालयPoliceपोलिस